• Fri. Jul 31st, 2026

    Mumbai News: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार! जलवहन बोगद्यांना मंजुरी; नि:क्षारीकरण प्रकल्प २०२९पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

    Mumbai News: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार! जलवहन बोगद्यांना मंजुरी; नि:क्षारीकरण प्रकल्प २०२९पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

    Manori Desalination Plant: मनोरी येथे शहरातील पहिला सागरी जलशुद्धीकरण प्रकल्प बांधला जात आहे. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेशी जोडण्यासाठी भुयारी बोगदे बांधण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईच्या वाढच्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी, मुंबई महापालिकेकडून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याकरीता मालाड मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ७.२ किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्यांच्या बांधणीचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. जमिनीखाली १२८ मीटरवर तीन जलवहन बोगदे बांधण्यात येणार आहेत. त्यांची एकूण ७.२ किमी आहे.

    समुद्राचे खारे पाणी गोडे कारणार

    या प्रकल्प प्रस्तावाचे सादरीकरणही या बैठकीत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा नि:क्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, तीन ते चार वर्षांपासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला होता. अखेर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एका कंपनीची निवड केली आहे. मनोरी नि:क्षारीकरण प्रकल्पात भूमिगत तीन बोगदे पाणी आणण्यासाठी आणि पाणी सोडण्यासाठी बांधावे लागणार आहेत.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: ‘एल निनो’ काळात जुलैमध्ये अधिक पाऊस! हवामान बदलामुळे मान्सूनचा अंदाज अनिश्चित; महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

    या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर असे एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण होताच पी उत्तर मालाड, पी दक्षिण गोरेगाव, आर मध्य बोरिवली पश्चिम, आर उत्तर दहिसर आणि आर दक्षिण कांदिवली या वॉर्डांना त्याद्वारे पाणी मिळेल.

    प्रकल्पावर स्थायी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पाण्याची गुणवत्ता, निविदा प्रक्रिया, तांत्रिक बाबी, तसेच प्रकल्प खर्चातील १६ टक्के आकस्मिक निधी (कंटिजन्सी) यावर सदस्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले. जलवाहन बोगद्यांसाठी, प्रकल्पासाठी ‘अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ कंपनीला डिझाइन, बांधकाम, संचालन आणि देखभालीचे कंत्राट देण्याचे सादरीकरण स्थायी समितीत करण्यात आले.

    Maharashtra TimesMumbai News: महामुंबईला तिहेरी गती! मेट्रो, लिंक रोड आणि दुहेरी बोगद्यांच्या कामाला गती; ऑगस्टपासून प्रवासात दिलासा मिळणार

    आरोग्यावर परिणाम होईल का?

    शिवसेना उबाठा पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी खारे पाणी गोडे केलेल्या पाण्याची गुणवत्ता भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातून मिळणाऱ्या पाण्याइतकीच राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला. ‘हा प्रकल्प आणि बोगद्यांची निविदा एकत्र काढली असती, तर विलंब टाळता आला असता. प्रकल्पातील १६ टक्के आकस्मिक निधीची गरज काय,’ असा प्रश्न काँग्रेसचे महापालिका गटनेते अशरफ आझमी यांनी केला. ‘या प्रकल्पातील पाणी आणि भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी एकत्र मिसळल्याने आरोग्यावर परिणाम होणार नाही ना,’ अशी शंका काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी व्यक्त केली. यावर ‘प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याइतकीच ठेवली जाईल,’ अशी ग्वाही बांगर यांनी दिली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा