Nagpur Old Woman throws Boiling Water : संतापलेल्या आजीने हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट चिमुरड्याच्या अंगावर फेकली. उकळते पाणी अंगावर पडताच तो वेदनेने किंचाळू लागला
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे (वय ४) असे जखमी बालकाचे नाव असून तो कोराडी येथील आरामशिन परिसरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये आई-वडिलांसह राहत होता. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ओम घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने रंग खेळत होता. त्याचवेळी त्याची चुलत आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत घेऊन अंगणातून जात होत्या.
Nashik Crime : दहावीच्या सात मुलांचा लहानग्यांवर अनैसर्गिक अत्याचार, नाशकात समाजकल्याण विभागाच्या हॉस्टेलमधील प्रकार
ओम वेदनेने किंचाळू लागला
खेळाच्या नादात ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. मात्र या क्षुल्लक प्रकारामुळे संतापलेल्या आजीने हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर फेकली. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने किंचाळू लागला. त्याच्या कमरेखालच्या भागाला गंभीर भाजल्या गेल्याने घरच्यांनी तातडीने त्याच्यावर थंड पाणी टाकले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. घटनेनंतर बालकाला तातडीने नागपूरमधील नेल्सन या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार ओम सुमारे ४५ टक्के भाजल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.
Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार, 43 वर्षीय चुलत दिराला दहा वर्ष सक्तमजुरी, बारामती कोर्टाचा निकाल
CCTV मध्ये घटना कैद
दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडिओमध्ये काळ्या साडीत असलेली महिला हातात बादली घेऊन जाताना दिसते. त्यावेळी मुलगा पिचकारीने रंग उडवतो आणि संतापाच्या भरात ती त्याच्यावर बादलीतील गरम पाणी ओतताना दिसते. पाणी अंगावर पडताच मुलगा वेदनेने उड्या मारत ओरडताना दिसतो. त्यानंतर घरातील इतर महिलांनी धाव घेऊन त्याच्यावर थंड पाणी टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही फुटेजमध्ये दिसते. विशेष म्हणजे ओम हा त्या महिलेच्या मुलीचा मुलगा असून तो आई-वडिलांसह आजीकडेच राहत होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
