२०१५ मध्ये महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर २०२० मध्ये पुढची निवडणूक होत अपेक्षित होते. मात्र विविध कारणांनी ही निवडणूक अपेक्षित कार्यकाळात झाली नाही. मे २०२० मध्ये अपेक्षित असणारी निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये पार पडली. या मधल्या काळात महापालिकेवर प्रशासक होते. आता निवडणुका होऊन महापालिकेवर लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण १११ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात भाजपचे ६५, शिवसेनेचे ४२, उबाठा गटाचे २, मनसे १ आणि अपक्ष १ नगरसेवक निवडून आले आहेत. यामधील चौदा गावांतील अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या ६६ झाली आहे.
Mumbai Crime: जेवणावरुन पती-पत्नीत पेटला वाद; भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मेहुण्याचा दाजीने घेतला जीव, मुंबईतील भयंकर घटना
निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्याच महासभेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेतेपदांसह स्वीकृत सदस्यांची, स्थायी समिती सदस्यांची, परिवहन समिती आदी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या सभापतीपदांची निवड करणे शिल्लक आहे. ती निवड आता केली जाणार आहे.
गुरुवारी स्थायी समिती, परिवहन समिती, विधी समिती, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती, क्रीडा सांस्कृतिक व झोपडपट्टी सुधार समिती, पाणीपुरवठा व मलनिःसारण समिती, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय साहाय्य समिती, महिला व बालकल्याण समिती, आठ प्रभाग समित्यांसह विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे.
Government Hostel GR : शासकीय वसतिगृहांच्या नावातून ‘मागासवर्गीय’ शब्द वगळला; महापुरुषांची नावे मिळणार, सामाजिक न्याय विभागाचा ऐतिहासिक निर्णय
प्रमुख समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. स्थायी समिती ही पालिकेच्या तिजोरीवर लक्ष ठेवणारी समिती आहे. शहरातील कामे या समितीच्या मंजुरीनंतरच मार्गी लागतात. त्यामुळे ही सर्व समित्यांपैकी महत्त्वाची समिती आहे. त्यामुळे या समितीचे सभापतीपद तितकेच महत्त्वाचे मानले जाते. या समितीच्या सभापतीपदासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मात्र प्रत्यक्षात सभापती पदावर कोण येईल याची उत्सुकता आहे.
वेळापत्रक जाहीर
प्रत्येक समितीतील सदस्यांमधून आता सभापतींची निवड करण्यात येणार असून यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सभापतीपदासाठी बुधवार, ४ मार्च रोजी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे गुरुवारी ५ मार्च रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही आहे. आणि शेवटी सभापती निवडणूक प्रक्रिया पार पडून त्यातून सभापतींची निवड केली जाणार आहे.
Rajya Sabha Election : राष्ट्रहितासाठी ठाकरेंनी राज्यसभेचा हट्ट सोडावा, काँग्रेसने गणित मांडलं; समीकरण तेच, तरी मविआत पेच
परिवहन समितीमध्ये फक्त भाजप
परिवहन समितीच्या सभापतींचीही निवड याच वेळी होणार आहे. मात्र परिवहन समितीच्या सदस्य पदासाठी केवळ सत्ताधारी असलेल्या भाजपचेच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या समितीवर सध्या तरी पूर्णपणे भाजपचे वर्चस्व आहे. सभापती भाजपचाच होणार हे निश्चित आहे. सत्ताही एकहाती भाजपचीच राहणार हे निश्चित आहे
