चंद्रग्रहण असताना गर्भवती महिलेने भाजी चिरू नये, अशी अंधश्रद्धा सर्रासपणे बाळगली जाते. पण या अंधश्रद्धेच्या विरोधात जागृती करण्यासाठी पुण्यात एका गर्भवती महिलेने भाजी चिरुन नवा संदेश दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यात चंद्रग्रहणाच्या निमित्ताने अंधश्रद्धेविरोधात एक हटके उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘सोडा अंधश्रद्धेचं ग्रहण’ हा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रहण लागलं की अजूनही अनेक ठिकाणी गर्भवती महिलांना भाजी चिरू नको, कात्री लावू नको, काही खाऊ नको असं सांगितलं जातं. “ग्रहणात भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात”, अशी समजूत आजही काही घरांमध्ये पाळली जाते. पण पुण्यातील नांदेड सिटी, सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी ही समजूत फेटाळली. ग्रहण सुरू होताच त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन भाज्या चिरल्या, कात्रीने कागद कापले आणि अगदी निर्धास्तपणे जेवणही केलं.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “माझ्या बाळावर अंधश्रद्धेचे नाही तर वैज्ञानिक विचारांचे संस्कार व्हावेत म्हणून मी हे केलं.” दरम्यान, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय निटवे यांनीही स्पष्ट केलं की बाळाचे ओठ फाटणे हे जनुकीय कारणांमुळे किंवा आईच्या पोषणाच्या कमतरतेमुळे होतं. त्याचा ग्रहणाशी काहीही संबंध नाही. अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. Rajya Sabha Election 2026 : मविआत उमेदवारीसाठी रस्सीखेच, अखेर शरद पवारांचं नाव ठरलं? जयंत पाटील यांनी सांगितली Inside Story
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची प्रतिक्रियी
“ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. आज भारतामध्ये चंद्रग्रहण सुरु आहे. चंद्रग्रहणाबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये आहे. राहू आणि केतू या नावाचे दोन राक्षस चंद्राला गिळायला येतात, अशी एक मोठ समजूत आहे. ग्रहण काळात आपल्या घरातील अन्न, पाणी दुषित होतं. त्यामुळे ते बाहेर टाकून दिलं जातं. तसेच गरोदर महिलांना ग्रहण काळात भाजी चिरु दिली जात नाही. ग्रहण काळात भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात अशी अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आज महाराष्ट्र निर्मूलन अंधश्रद्धा समितीने सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण हा उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये चांदणी प्रफुल्ल थोरात या गरोदर महिलेने भाजी चिरली आणि दाखवून दिलं की ग्रहणामध्ये गरोदर महिलांनी अंधश्रद्धा पाळू नये”, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा