• Sun. Mar 8th, 2026

    Nashik News: सिंहस्थात भाविकांसाठी थेट स्नानघाटापर्यंत ‘रुट मॅप’, 15- 20 किमीचा पायी प्रवास वाचणार; थेट वाहनतळांपर्यंत ‘शटल बस’

    Nashik News: सिंहस्थात भाविकांसाठी थेट स्नानघाटापर्यंत ‘रुट मॅप’, 15- 20 किमीचा पायी प्रवास वाचणार; थेट वाहनतळांपर्यंत  ‘शटल बस’

    Simhasta Kumbh Mela: 2027मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुभमेळ्यात भाविकांना 15 -20 किमी पायी प्रवास करावा लागणार नाही यासाठी शटल बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: आगामी सिंहस्थात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेसह नियंत्रणासाठी पोलिस यंत्रणेने त्रिस्तरीय गर्दी सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक आराखडा निश्चित केला आहे. वाहने जिल्ह्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर जिल्ह्याबाहेर भाविकांची अडविण्यात येणार असून, बाह्य ते अंतर्गत वाहनतळांपर्यंत ‘शटल बस’ची व्यवस्था राहणार आहे. यासह अंतर्गत स्नानघाटांपर्यंत भाविकांसाठी ‘रुट मॅप’ तयार केला असून, भाविकांना एका बाजूने ६४० वाहनतळापासून मीटर ते ७.९ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागणार वेध सिंहस्थाचे आहे.

    गर्दी नियंत्रणासाठी एआय

    कृत्रिम बुद्धिमत्तेसह (एआय) अद्ययावत तंत्रज्ञानानुसार आगामी सिंहस्थात पोलिसिंग आणि गर्दी नियंत्रणाची तयारी करणाऱ्या यंत्रणांनी आता वाहनतळांसह ‘होल्डिंग पॉइंट’च्या निश्चितीवर भर दिला आहे. शहर व जिल्ह्यातील वाहनतळांबाबत बैठकी सुरू असताना प्रयागराजमध्ये महाकुंभावेळी शेकडो किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने उद्भवलेल्या भीषण स्थितीतून धडा घेत आगामी सिंहस्थात नाशिक जिल्ह्याबाहेरपर्यंत तटबंदी करण्याचा यंत्रणांचा विचार आहे. त्यासाठी विविध ठिकाणी वाहने रोखण्याचे नियोजन केल्याचे पोलिसांच्या सिंहस्थ कक्षातील सूत्रांनी सांगितले.Maharashtra Timesअटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा Ulwe Coastal Road, प्रवासात वाचणार 25 मिनिटं; 6.7 किमी मार्ग कुठून-कसा?

    दरम्यान, गत सिंहस्थात शहराबाहेर वाहने रोखली होती. त्यामुळे १५ ते २० किलोमीटरपर्यंत भाविकांना पायी चालावे लागले होते. सन २०२६-२७ मधील सिंहस्थातही जिल्ह्याबाहेर वाहने थांबविण्यात येणार असली, तरी अंतर्गत पार्किंग स्नानघाटांच्या जवळच्या जागेत करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त १५ किलोमीटर एका मार्गावरील भाविकांना पायी जावे लागू शकते. उर्वरित मार्गावरील भाविकांना एक ते बारा किलोमीटर अंतर यावे-जावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

    Maharashtra TimesGhansoli to Airoli Flyover: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी खाडीवर पूल, घणसोली ते ऐरोली उन्नत मार्गाला गती; कसा असेल मार्ग?

    कशा असेल सेवा?

    प्रमुख मार्गांवरील धुळे, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पेठ, दिंडोरी, गंगापूर आणि त्र्यंबकेश्वरवरून येणाऱ्या भाविकांना बाह्य पार्किंगसह शटल बसचा वापर करून, काही अंतर चालून स्नानघाटात पोहचता येणार आहे. दरम्यान, ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांसाठीही या सुविधा उपलब्ध असणार आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानक, देवळाली कॅम्प, ओढा, खेरवाडी, कसबे-सुकेणे या रेल्वे स्थानकांवरून ही शटल बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर 1-1.5 किमी पायी चालून स्नानघाटापर्यंत पोहचता येणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा