UTS App Discontinued: मुंबईकरांना आता यूटीएस वरून लोकल तिकीट काढता येणार नाही आहे. त्या ऐवजी रेलवनचा उपयोग करावा लागणार आहे.
RailOne मुळे फायदा होणार?
1 मार्चपासून देशात आरक्षित आणि अनारक्षित तिकीट खरेदीसाठी रेलवन हा एकमेव ॲप राहणार आहे. त्यासह या ॲपवर प्रवाशांना ट्रेनचं लाइव्ह लोकेशनही पाहता येणार आहे. रेल्वे प्रवाशांना रेल्वे संदर्भातील सर्व कामांसाठी वेगवेगळ्या ॲप व संकेतस्थळांवर अवलंबून न राहण्याची गरज नाही. फक्त एकाच ठिकाणी दैनंदिन प्रवासात लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रवाशांना मिळणार आहेत. याशिवाय, रेलवनवरून प्रवासी IRCTCसोबत नोंदणी केलेल्या ठिकाणांवरून खाद्य पदार्थ मागवू शकतात, तक्रारी नोंदणीसह तिकीट रद्द किंवा परतावाही मिळवणं शक्य होणार आहे.
Dahisar-Mira-Bhayander Metro: मेट्रो लाइन 9ची चाचणी फेरी यशस्वी, किरकोळ बदलांनंतर पहिला टप्पा होणार सुरू; दहिसर ते काशीगाव थेट जोडणी
जुन्या पासचं काय होणार?
यूटीएस वापरकरत्यांना रेलवनवर नवं अकाऊंट उघडण्याची गरज नाही. रेलवन ॲपवर UTSवरील लॉग इन आणि पासवार्ड टाकून प्रवासी ॲप वापरू शकतात. पासवर्ड विसरल्यास पूर्वी नोंदवलेल्या मोबाइल क्रमांक किंवा e-mail id वरून OTP वापरून अकाऊंट उघडू शकता. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच, मुख्यपुष्ठावर ‘माय बुकिंग’ खाली आपले तिकीट किंवा रेल्वे पास पाहू शकतात.
Mumbai-Goa Highway: उर्वरित मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण, बाह्यवळण मार्ग, दोन पूल, रेल्वे उड्डाणपूल… कधी होणार काम?
यूटीएसच्या R-Walletमधील पैसेही पास आणि तिकिटांसह सहजपणे रेलवनवर ट्रान्सफर होतील. यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करण्याची गरज नाही. अद्याप यूटीएस ॲप बंद झाला नाही आहे त्यामुळे प्रवासी रेलवन वर नोंदणी करू शकतात. परंतू यूटीएसवरून आता तिकीट आणि पास खरेदी करणं बंद झालं आहे. पण प्रवाशांनी यापूर्वी बुक केलेला सीझन पास यूटीएस तिथेच राहणार आहे.
दरम्यान, प्रवाशांना ‘रेलवन’चा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रवाशांना तिकीट आणि पास खरेदी करताना 3 टक्के सवलत दिली जाणार आहे. तसच, भीम यूपीआयद्वारे तिकीट खरेदी केल्या कॅशबॅकही सुरू केला जाणार आहे.
