• Tue. Aug 4th, 2026
    Nagpur News:संशोधनाचा चमत्कार!रात्रीदेखील सोलर पॅनलद्वारे होणार ऊर्जानिर्मिती

    Nagpur News: दिवसा मिळणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे सोलर पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती होतेच. पण आता रात्री देखील सोलर पॅनलद्वारे ऊर्जानिर्मिती होणार आहे. हा चमत्कार जरी वाटत असला तरी ही संशोधनाची कमाल आहे.नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय ढोबळे व लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांनी संयुक्तरीत्या हे संशोधन पूर्ण केले आहे.

    म.टा. प्रतिनिधी,नागपूर: सोलर पॅनलद्वारे रात्रीदेखील विद्युत ऊर्जानिर्मिती शक्य होणार आहे. एलईडी दिव्यांच्या माध्यमातून रात्री सोलर पॅनलद्वारे विद्युतनिर्मिती करणारे नाविन्यपूर्ण संशोधन करीत संशोधकांनी यूके डिझाइनचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय ढोबळे व लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांनी संयुक्तरीत्या हे संशोधन पूर्ण केले आहे.

    सोलर पॅनल विद्युत ऊर्जानिर्मितीचा मुख्य स्रोत

    नैसर्गिक ऊर्जास्रोत मर्यादित असल्याने कृत्रिमरीत्या ऊर्जेची निर्मिती कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित होऊ लागले आहे. सोलर पॅनल विद्युत ऊर्जानिर्मितीचा मुख्य स्रोत बनले आहे. सरकारच्या विविध सुविधा असल्याने बहुतांश घरांवर सोलर पॅनल लागलेले दिसतात. त्यामुळे त्या कुटुंबांचे विजेचे बिलदेखील शून्यावर आले आहे.

    सोलर पॅनल फोटॉनद्वारे ऊर्जेची निर्मिती करते

    सोलर पॅनल आता बायफेशियलच्या रूपात यायला सुरुवात झाली आहे. हे सोलर पॅनल दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाशातील फोटॉन मिळवितात. यामध्ये सोलर पॅनलचा वरील भाग सूर्यप्रकाशाच्या प्रत्यक्ष संपर्कात येतो, तर खालील भाग परिवर्तित प्रकाशाच्या संपर्कात येतो. त्यामुळे सोलर पॅनल दोन्ही बाजूंनी फोटॉनद्वारे ऊर्जेची निर्मिती करते. मात्र, सूर्यप्रकाश कमी झाल्यावर यामध्ये ऊर्जानिर्मिती मंदावते आणि अपेक्षित प्रमाणात ऊर्जानिर्मिती होत नाही.

    Maharashtra TimesNagpur News: पंचमुखी हनुमान मंदिराचा होणार कायापालट ; बाभुळखेडा पर्यटनस्थळासाठी १४.६१ कोटी मंजूर

    सोलर पॅनल रात्रीच्या वेळीदेखील ऊर्जामय होतात.

    यावर डॉ. संजय ढोबळे व डॉ. विजय पावडे यांनी संयुक्तपणे संशोधन करीत सोलर पॅनलच्या खालच्या व वरच्या भागावर एलईडी दिवे लावले. एलईडी दिवे हवेच्या माध्यमातून पवनऊर्जेद्वारे निर्माण झालेली ऊर्जा साठवून ठेवतात. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाली की एका सेन्सरद्वारे दोन्ही बाजूंनी लावलेले एलईडी दिवे प्रकाश देऊ लागतात. त्यामुळे कृत्रिम प्रकाशात सोलर पॅनल रात्रीच्या वेळीदेखील ऊर्जामय होतात.

    रात्रंदिवस सोलर पॅनलद्वारे ऊर्जानिर्मिती करणे शक्य होणार असल्याने भविष्यात सोलर पॅनल ऊर्जानिर्मितीचे मुख्य स्रोत म्हणून ओळखले जाईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

    Maharashtra TimesNagpur Crime: कुख्यात एमडी तस्कर आशी डेला निर्घृणपणे संपवलं; कन्हान नदीत फेकली बॉडी, प्रियकराचा शोध सुरु

    बाहेरून ऊर्जा न घेता ऊर्जेची निर्मिती होते.

    या प्रक्रियेमध्ये बाहेरून ऊर्जा न घेता या प्रयोगाद्वारे ऊर्जेची निर्मिती होते. या समाजोपयोगी संशोधनाबद्दल डॉ. संजय ढोबळे आणि डॉ. विजय पावडे यांचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य आणि कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी कौतुक केले आहे.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा