Navi Mumbai Airport to Thane Flyover: ठाणे-नवी मुंबई विमानतळादरम्यान उन्नत मार्ग उभारण्याचं काम सुरू होणार आहे. यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी झालं आणि डिसेंबर 2025 मध्ये विमानसेवा सुरू झाली. भविष्यात विमानसेवांची संख्या वाढली की विमानतळावरची वर्दळही वाढेल, त्यामुळे विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीत सुधारणा करण्यासाठी विविध प्रकल्पांच्या योजना आहेत, ठाणे-नवी मुंबई विमानतळादरम्यानचा उन्नत मार्ग हा त्याचाच एक भाग आहे.
Khandesh Expressway: उत्तर महाराष्ट्र- मराठवाडा ‘खान्देश एक्स्प्रेस’ महामार्ग! सहापदरी, 105 किमी लांब मार्गाने थेट समृद्धीला जोडणार
कुठून-कसा असेल मार्ग?
ठाण्यात दिघामधल्या पटनी मैदान इथून हा उन्नत मार्ग सुरू होईल, वाशीतल्या पाम बीच रोडपर्यंतचा सुमारे 17 कि.मी. चा मार्ग ठाणे-बेलापूर महामार्गाला समांतर असेल, त्याच्या पुढे नवी मुंबई विमानतळापर्यंतचा नऊ कि.मी.चा उन्नत मार्ग दुमजली (डबल डेकर) बांधण्यात येणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या वाहनांना ताशी 100 कि.मी. वेगाची मर्यादा असेल, सहा ठिकाणी इण्टरचेंजेस असतील. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर भागातल्या प्रवाशांना होईल.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 2025च्या सप्टेंबरमध्ये वा प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 6.363 कोटी रुपये एवढा आहे. पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या या मार्गाची उभारणी सिडको करेल. या उन्नत मार्गाचा वापर करण्यासाठी टोलही द्यावा लागणार आहे. पर्यावरणीय आणि नियामक मंजुऱ्या मिळवण्याचं काम करण्यासाठी सिडकोला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर पुढच्या तीन वर्षांत मार्ग बांधून पूर्ण करण्यात येईल.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: राज्यात बुलेट ट्रेनची 4 स्थानकं, पहिल्या टप्प्यात ठाणे, विरारचा विकास; कधी-कसं होणार काम?
बेलापूर-मानखुर्द मेट्रो मार्ग
नवी मुंबई विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गाने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी जो मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे. तो मानखुर्द आणि बेलापूरमार्गे जाणार आहे. त्यातल्या बेलापूर ते मानखुर्द मेट्रो मार्गाचा (मेट्रो मार्ग 8) अभ्यास सिडकोने सुरू केला आहे. हा मार्ग मानखुर्दहून वाशी खाडीवरचा पूल ओलांडून सायन-पनवेल महामार्गावरून बेलापूर आणि पुढे विमानतळाकडे नेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचं काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, प्रत्यक्ष बांधकाम जून 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
