Bellasis Bridge Renamed: मुंबई सेंट्रल येथील 130 वर्ष जुना बेलासिस पुलाची पुनर्बांधनी नुकतीच पूर्ण झाली. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्त पुलाचं उद्घाटन झालं असून यावेळी पुलाचं नामांतरही करण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. ‘ताडदेव-नागपाडा आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा हा एक महत्त्वाचा पूल जवळपास १३० वर्षे जुना होता. त्याचे आयुर्मान पूर्णपणे संपले होते. त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. हा पूल बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आणि अतिशय वेगाने ते पूर्ण केले.
Flight Ticket Refund: विमान तिकीट आता विनादंड रद्द होणार! DGCAच्या नव्या नियमांमुळे प्रवाशांना दिलासा; कसा होणार फायदा?
१ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेले पुलाचे काम ६ जानेवारीला म्हणजेच अवघ्या १५ महिने सहा दिवसांत पूर्ण झाले’, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ‘मुंबई महानगरात सध्या गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग प्रकल्पातील उड्डाणपुलाची गोरेगाव बाजू, विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल, शीव (सायन) रेल्वे उड्डाणपूल, महालक्ष्मी रेल्वे उड्डाणपूल, नेहरू तारांगण आणि मानखुर्द उड्डाणपूल या विविध ठिकाणचे सहा मोठे उड्डाणपूल निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहेत. महापालिकेच्या माध्यमातून नजीकच्या काळात या सर्व पुलांचे लोकार्पण केले जाईल, ज्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल’, असेही त्यांनी सांगितेले.
Karjat-Panvel Railway: कर्जत-पनवेल थेट लोकलने प्रवास, डोंगरातून बोगदा तयार; 29 किमी लांब मार्गिकेने 30 मिनिटांत होणार अंतर पार
या पुलाचे काम आव्हानात्मक होते. पुलाची उभारणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सर्व अडथळ्यांवर मात करत प्रकल्प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता महापालिकेने घेतली. त्यामुळे पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यात यश मिळाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महापौर रितू तावडे या पुलाच्या लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्यासह विविध अधिकारी याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. हा उड्डाणपूल सुरू झाल्याने जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचा बेलासिस मार्ग), डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (ग्रॅण्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
