• Fri. Mar 6th, 2026
    32 वर्षीय सख्ख्या मामीसोबत किळसवाणं कृत्य, 30 वर्षीय भाच्याला अटक, बेडवर झोपल्याचं भासवून घाणेरडं काम

    Nagpur Woman Molested : महिला आपल्या बेडरूममधील कपाटातून मुलाचे कपडे काढत असताना आरोपीने बेडवर झोपल्याचे भासवले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागपुरातील यशोधरा नगर परिसरात उघडकीस आली आहे. आपल्याच सख्ख्या मामीसोबत आक्षेपार्ह कृत्य करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

    काय आहे प्रकरण?

    मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिला यशोधरा नगर भागात आपल्या पती व कुटुंबासह राहते. आरोपी हा नात्याने तिचा भाचा असून काही दिवसांपासून तो त्यांच्या घरी ये-जा करत होता. विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

    नेमकं काय घडलं?

    पहिल्यांदा १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. महिला आपल्या बेडरूममधील कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी आरोपी बेडवर झोपल्याचे भासवत होता. महिला कपडे घेऊन बाहेर पडत असताना आरोपीने अचानक तिला मागून पकडण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे महिला घाबरली व तिने आरोपीला जाब विचारला. मात्र आरोपीने कोणतेही उत्तर न देता तेथून पळ काढला. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य घरात नसल्याने महिला घाबरली होती; तरीही नातेसंबंधांमुळे तिने तो प्रसंग दुर्लक्षित केल्याचे सांगितले जाते.
    Maharashtra TimesKomali : इंजिनिअर प्रियकराशी ब्रेकअप, 21 वर्षीय यूट्यूबर तरुणीने आयुष्य संपवलं, काकाच्या घरात टोकाचं पाऊल

    दहा दिवसात दोनदा विनयभंग

    यानंतर २४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास पुन्हा महिला घरात एकटी असताना समोरच्या खोलीचा दरवाजा लावत होती. त्याच वेळी बेडरूममध्ये दबा धरून बसलेल्या आरोपीने पुन्हा तिच्या पाठीमागून येत आक्षेपार्ह चाळे केले. या प्रकारामुळे महिला घाबरली, मात्र तिने धैर्य दाखवत आरोपीला जोरात धक्का दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेनंतर ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात मसाज पार्लरवर पोलिसांची धाड, इमारतीतून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पतीच्या मागणीनंतर CID चौकशी
    सततच्या छळाला कंटाळून अखेर महिलेने यशोधरा नगर पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. भारतीय दंड संहितेच्या विनयभंगासंदर्भातील विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा