• Sat. Mar 7th, 2026
    Jay Patil : चेन्नई बीच दुर्घटनेतील जयची बॉडी सापडली, आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश

    Jalgaon Youth Drown on Chennai Beach : चेन्नई बीच दुर्घटनेतील बेपत्ता असलेल्या जय पाटीलचा मृतदेह सापडला आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा दोनवर गेला आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    जळगाव जय पाटीलचा मृतदेह सापडला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, जळगाव : चेन्नईतील गोल्डन बीचवर शनिवारी झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. या दुर्घटनेनंतर वाहून गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) येथील रहिवासी जय पाटीलचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला.

    जय पाटीलचा मृतदेह सोमवारी कांथाट्टरच्या शेजारच्या गावाजवळील किनारपट्टीवर सापडला. त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाला सोपवण्यासाठी औपचारिकता सुरु आहे. शनिवारी आयटी सेवा कंपनी ‘कॉग्निझंट’चे तीन इंटर्न ईस्ट कोस्ट रोडवरील गोल्डन बीच येथे फिरायला गेले होते. हे सारे एके ठिकाणी सेल्फी घेत असताना शक्तिशाली लाटांमुळे तीनजण पाण्यात ओढले गेले. या दुर्घटनेत जय पाटील बेपत्ता झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शोधकार्याला गती देण्याची विनंती केली होती.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यातील ‘द रुट्स स्पा’ सेंटरवर छापा, महिला कर्मचारी अन् व्यवस्थापकाने इमारतीवरुन उडी मारली; महिलेचा मृत्यू

    नेमकं काय झालं?

    बी. ई. शिक्षण पूर्ण केलेला जय पाटील ५ फेब्रुवारीला चेन्नईतील नामांकित ‘कॉग्निझंट’ कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता. शनिवारी सुट्टी असल्याने तो काही सहकाऱ्यांसोबत समुद्र किनारी फिरण्यासाठी गेला होता. या वेळी अचानक समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या आणि त्यात जयसह तीन जण ओढले गेले.

    आई-बहिणीपासून वृत्त लपवलं

    जयचे वडील नरेंद्र पाटील शेतकरी असून, आई शिक्षिका आहे. जयच्या बहिणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे घरातील वातावरण आधीच तणावाचे आहे. बहिणीच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये आणि आईला धक्का बसू नये, यासाठी या घटनेची माहिती आईला अद्याप देण्यात आलेली नाही. जयचे काही नातेवाईक तातडीने चेन्नईला रवाना झाले आहेत.
    Maharashtra TimesIMD Rain Alert: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, अनेक जिल्ह्यांना झोडपलं; आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार? IMD चा ताजा अंदाज

    भंडाऱ्यातील तरुणीचाही मृत्यू

    चेन्नईतील गोल्डन बीचवर सेल्फी घेत असतानाच आलेल्या उंच लाटांनी समुद्रात ओढून घेतल्याने झालेल्या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील वरठी (भंडारा रोड) येथील एका तरुणीचाही बुडून मृत्यू झाला. मयुरी हरिश्चंद्र चौधरी असे या तरुणीचे नाव आहे.
    Maharashtra TimesPune News: पुण्यात लग्नानंतर पतीकडून शारीरिक संबंधांना टाळाटाळ, पत्नीची थेट न्यायालयात धाव; नंतर दोघांच्या सहमतीने…

    मृत तरुणीवर अंत्यसंस्कार

    चेन्नई येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेली असता मृत्युमुखी पडलेली मयुरी हरिचंद्र चौधरी (रा. वरठी, ता. मोहाडी) हिच्यावर काल सोमवारी रात्री वरठी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे पार्थिव काल सोमवारी चेन्नईहून आणण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा