मालेगावची बदनामी करणाऱ्यांना महापालिकेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका महापौरांनी घेतली आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
काही दिवसांपूर्वी मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडलं होतं. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या मालेगावचा दौऱ्यामध्ये महापालिकेत जाणार आहेत. मात्र, महापौरांनी त्यांना महापालिकेत पाऊलही ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘मालेगावची बदनामी खपवून घेणार नाही’
महापौर नसरीन शेख यांनी सोमय्यांवर तोफ डागताना म्हटले की, किरीट सोमय्या यांनी जन्म दाखल्याच्या प्रकरणावरून मालेगाव शहराची नाहक बदनामी केली आहे. जे लोक शहराचे नाव खराब करतात, त्यांना महापालिकेत येण्याचा कोणताही अधिकार नाही. आता मालेगावात प्रशासक राज नसून जनतेचं राज्य आहे. आम्ही सर्व नगरसेवक, उपमहापौर आणि मी स्वतः महापौर म्हणून त्यांना महापालिकेत येण्यापासून रोखणार आहोत.
Kalyan News : रेबीजच्या लक्षणांनी तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले; गळफास घेत आयुष्याचा शेवट, कल्याणमधील घटना
विशिष्ट समाजाला टार्गेट केल्याचा आरोप
यावेळी महापौरांनी खळबळजनक आरोप करत म्हटले आहे की, मालेगाव शहरात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून कारवाई केली जात आहे. SIT चा अहवाल अद्याप आलेला नाही, तरीही १०४४ लोकांना या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. हा केवळ शहराला बदनाम करण्याचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला.
Nanded News: तोंडाशी आलेला घास हिरावला, नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार, बळीराजाची चिंता वाढली
दरम्यान, आता सोमय्यांच्या या दौऱ्यामुळे मालेगावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सोमय्या मालेगावात पोहोचल्यानंतर हा संघर्ष काय वळण घेतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
