Special Train For Holi: सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण १८ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू झाले आहे.
पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (आठ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४६९ ही २४ फेब्रुवारी व तीन मार्च रोजी दुपारी १:५० वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक. ०१४७० ही २५ फेब्रुवारी व चार मार्च मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता नागपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता पुण्यात येईल.
पुणे-गोरखपूर दैनिक विशेष (३२ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४१५ ही २१ फेब्रुवारी ते आठ मार्चदरम्यान दररोज सकाळी ६:५० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४:०० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४१६ ही २२ फेब्रुवारी ते – नऊ मार्चदरम्यान दररोज सायंकाळी ५:३० वाजता गोरखपूरहून सुटून पुण्यात – तिसऱ्या दिवशी पहाटे ३:१५ वाजता पोहोचेल.
Harshwardhan Sapkal: मविआने काँग्रेसला राज्यसभेत जागा द्यावी; हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून मागणी
पुणे-दानापूर दैनिक विशेष (३२ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४४९ ही २१ फेब्रुवारी ते आठ मार्चदरम्यान दररोज दुपारी ३:३० वाजता पुण्याहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २:४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४५० ही २३ फेब्रुवारी ते १० मार्चदरम्यान दररोज सकाळी ५:०० वाजता दानापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:१५ वाजता पुण्यात येईल.
पुणे-दानापूर द्वि-साप्ताहिक (आठ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४८१ ही २३, २७ फेब्रुवारी; तसेच दोन व सहा मार्च रोजी सायंकाळी ७:५५ वाजता पुण्याहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४:२० वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४८२ ही २५ फेब्रुवारी, एक, चार व आठ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता दानापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:१५ वाजता पुण्यात पोहोचेल.
Pune Mumbai Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात; मोठा अनर्थ टळला!
पुणे-गाझीपूर शहर द्वि-साप्ताहिक (आठ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४३१ / ०१४३२ या २४, २७ फेब्रुवारी; तसेच तीव व सहा मार्च रोजी सकाळी ६:४० वाजता पुण्याहून सुटतील आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:०५ वाजता गाझीपूर येथे पोहोचतील. परतीच्या गाड्या २६ फेब्रुवारी, एक, पाच व आठ मार्च रोजी पहाटे ४:२० वाजता गाझीपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:२० वाजता पुण्यात येतील.
पुणे-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक (चार फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४९१ / ०१४९२ या २७ फेब्रुवारी व सहा मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता पुण्याहून सुटतील आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:०० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचतील. परतीच्या गाड्या २८ फेब्रुवारी व सात मार्च रोजी रात्री १२:१० वाजता हजरत निजामुद्दीनहून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ६:४० वाजता पुण्यात पोहोचतील.
