• Thu. Mar 12th, 2026

    Ratnagiri News: बदलीनंतरही अधिकारी रत्नागिरीतच ठाण मांडून, आकाशवाणी केंद्रातील प्रकार; महिलांच्या तक्रारीनंतर आदेश

    Ratnagiri News: बदलीनंतरही अधिकारी रत्नागिरीतच ठाण मांडून, आकाशवाणी केंद्रातील प्रकार; महिलांच्या तक्रारीनंतर आदेश

    Ratnagiri AIR: रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांनी एका अधिकाऱ्याविरुद्ध अपमानास्पद वागणुकीची तक्रार केली. या तक्रारीनंतर अधिकाऱ्याची बदली झाली. मात्र, बदलीचा आदेश असूनही अधिकारी रत्नागिरीतच थांबले आहेत. खासदार नारायण राणे यांनी हा विषय केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी: रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातील हंगामी स्वरूपात काम करणाऱ्या सहा ते सात महिलांनी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्याच्या बदलीचा आदेश आला. मात्र हा आदेश डावलत अधिकारी रत्नागिरीतच ठाण मांडून आहे.

    बदलीचा आदेश येऊन महिना

    अधिकारी मानसिक त्रास देत असल्याची तक्रार संबंध खासदार नारायण राणे यांच्याकडे लेखी तक्रार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत नारायण राणे यांनी हा विषय थेट केंद्रीय प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मांडला. त्यानंतर या अधिकाऱ्याच्या बदलीचे ५ जानेवारी २०२६ रोजी लेखी आदेश निघाले. हा बदलीचा आदेश येऊन जवळपास महिना होऊन गेला तरीही अद्याप हा अधिकारी रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रातच ठाण मांडून बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अधिकाऱ्याच्या बदलीच्या जागेवर दुसरा अधिकारी हजर झाल्यानंतरही ज्या अधिकाऱ्याबद्दल तक्रार आहे, तो मात्र रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रातच आहे. या अधिकाऱ्याने स्वतःचे सुसज्ज असे केबिन करून बाहेर बोर्डही लावला आहे.Maharashtra TimesMumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry: शिमग्याला कोकणात जाणं होणार सोपं, मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून; कसं असेल वेळापत्रत?

    रत्नागिरी आकाशवाणी केंद्रात गेली अनेक वर्षे अनुभवी असलेल्या स्थानिक महिला हंगामी तत्त्वावरती उद्घोषिका, हंगामी निवेदिका अशा पदांवर २० ते २५ वर्षे काम करत आहेत. मात्र या महिलांजवळ अर्वाच्च्य भाषेत बोलणे, आकाशवाणी केंद्रातून

    प्रशासन पाठीशी घालत असल्याचा संशय?

    शिपायाला सांगून बाहेर काढण्याची धमकी देणे, तुम्हाला पुन्हा ड्युटी देणार नाही अशा स्वरूपाची अपमानास्पद वागणूक, धमक्या या अधिकाऱ्याकडून या महिलांना दिल्या जात आहेत. इतकेच नाही तर काही महिलांना ड्युटी देणेही बंद केले. या सगळ्याची तक्रार आकाशवाणीच्या कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या महिलांनी केली होती. आकाशवाणीचे कोल्हापूर येथील सहाय्यक संचालक डॉ. सुनील गायकवाड यांनी त्या अधिकाऱ्याला योग्य ती समजही दिली. मात्र तरीही हा प्रकार सुरू राहिल्याने या महिलांनी अखेर खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर निवेदन दिले होते. राणे यांनी या तक्रारीची दखल घेतली व अधिकाऱ्याच्या बदलीचे आदेश निघाले. मात्र तरीही रत्नागिरी येथेच ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्याला आकाशवाणी प्रशासन पाठीशी घालत असल्याचा संशय आहे.

    १७ वर्षांपूर्वी लावलेलं झाड, अजित दादांच्या आठवणी, सुनेत्रा पवारांसाठी भावुक क्षण

    याविषयी डॉ. सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, ‘या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर १९ जानेवारीला त्याला रत्नागिरी येथून पदमुक्त करावे अशा स्वरूपाचा अहवाल आपण पुणे व मुंबई यांच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा