• Fri. Mar 13th, 2026

    D.N Nagar-Mandale Metro: ‘मेट्रो 2B’ मुंबई पूर्व-पश्चिम जोडणार, कुर्ल्यातील ‘यू-गर्डर’चं काम फत्ते; कशी असेल मार्गिका?

    D.N Nagar-Mandale Metro: ‘मेट्रो 2B’ मुंबई पूर्व-पश्चिम जोडणार, कुर्ल्यातील ‘यू-गर्डर’चं काम फत्ते; कशी असेल मार्गिका?

    Mumbai Metro 2B: मुंबई मेट्रो लाइन 2ब चा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. कुर्ला परिसरातील हलाव पुलावर दोन यू-गर्डर यशस्वीपणे उभारण्यात आले आहेत. डीएन नगर ते मंडाळे मेट्रोचा मार्ग पाहा

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: शहरातील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मेट्रो २बी मधील महत्त्वाचा टप्पा शनिवारी पूर्ण झाला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कुर्ला परिसरातील हलाव पुलावर दोन यू-गर्डरची उभारणी यशस्वीपणे केली आहे. पूल आणि मेट्रो गर्डर यांच्यातील कमी अंतरामुळे हे काम अतिशय आव्हानात्मक होते.

    लाखो प्रवाशांना फायदा

    डी. एन. नगर, वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूरसह मंडाळे अशा प्रमुख भागांना जोडण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो २बी ची आखणी केली आहे. मेट्रोमुळे बीकेसीसह कुर्ला-चेंबूर परिसरातील लाखो प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा मार्ग खुला होणार आहे. मेट्रो २बी वरील एस. जी. बर्वे मार्ग मेट्रो स्थानक विमानतळाच्या नियमानुसार एकाच स्तरावर उभारण्यात येत आहे. स्थानकाचे पाया आणि खांबाचे काम त्याचबरोबर पुलालगतचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येकी २० मीटर लांबीचे दोन यू-गर्डर ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनच्या मदतीने बसवण्यात आले.Maharashtra TimesKalyan-Shilphata Metro: नव्या ‘मेट्रो 12A’ ची घोषणा, कल्याण-शिळफाटा मार्गे नवी मुंबईला जोडणार; डोंबिवली, काटई नाका… कसा असेल मार्ग?

    मेट्रो रुळ उभारण्याचं काम

    हलाव पूल परिसरात विमानतळामुळे उंचीची मर्यादा आहे. परिणामी पूल आणि मेट्रो मार्ग यांच्यामध्ये केवळ ३.५ मीटर इतकेच अंतर होते. या ठिकाणी यू आकाराचे दोन गर्डर बसवणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक काम होते. वाहनांच्या वर्दळीला किमान बाधा व्हावी, यासाठी रात्रीच्या वेळी काम सुरू करण्यात आले. कामादरम्यान अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले असून हलक्या वाहनांना पूल वापरण्याची मुभा होती. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गर्डर उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले, असे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले. गर्डर यशस्वीपणे उभारल्यानंतर आता मेट्रोसाठी रुळ उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर विद्युतीकरण, दूरसंचार यंत्रणा आणि अन्य कामे करण्यात येतील.

    Maharashtra TimesKalyan-Taloja Metro: ‘मेट्रो लाइन 12’चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण, कल्याण-शिळफाटा-तळोजा मार्गाला समांतर धावणार मार्गिका; कुठे असणार स्थानकं?

    या गर्डर जवळ एस जी बर्वे मार्ग मेट्रो स्थानक असणार आहे. विमानतळाच्या उंचीचा मर्यादा लक्षात घेऊन येथे सिंगल लेवल स्थानक उभारण्यात आलं आहे. या स्थानकासाठी पाया रचला गेला असून हलाव पुलाच्या दोन्ही बाजूंचं कामही पूर्ण झालं आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा