सोलापूर: भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मागील काही दिवसांपासून वाद उफाळून आला आहे. जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकार परिषद घेत जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत विधान केले, कारण नसताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आज मी पत्रकार परिषद घेतली,” असा खुलासा सुषमा अंधारे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळ करतील या उद्देशाने वाह्यात बोलण्याची भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले, पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जी भाषा कळते, त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते,” असा हल्लाबोल अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी दाखवला व्हिडिओ
“पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले होते. त्याबाबत केस सुरू आहे, उलट त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. गोरे यांनी एका दलित व्यक्तीची जमीन हडपली, त्याने ॲट्रॉसिटी दाखल केली आहे. 6 मार्च 2025 रोजी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 8 मे 2026 नॉन बेलेबल अटक वॉरंट निघाले होता. गोरेंचा जामीन अर्ज फेटाळला गेला होता,” असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
“गोरे यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत”
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पोलिस ठाण्यात किती गुन्हे दाखल आहेत, याबाबत सविस्तर माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. “दहिवडी पोलिस स्टेशन, मिरज पोलिस स्टेशन, इस्लामपूर पोलिस स्टेशन, सातारा पोलिस स्टेशन, सातारा शहर पोलिस स्टेशन असे त्यांच्यावर साधारणत: 19 गुन्हे दाखल आहेत. तुम्हाला काय पालकमंत्री भेटला?” असा खरपूस टोला अंधारे यांनी लगावला आहे.
दरम्यान, “पालकमंत्र्यांनी सोलापुरातल शासकीय विश्रामगृहात दोन आलिशान सूट अतिशय सुंदर पद्धतीने तयार करून घेतले आहेत. त्यामुळे त्या सूटचा वापर कोणत्या कारणासाठी केला जातो, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. 10 कोटी खर्च करून दोन सूट का बंद असतात,” असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा