• Sat. Mar 14th, 2026

    13 वर्षांपासून रखडलेला दिवा रेल्वे उड्डाणपूल, फाटकामुळे लोकल-एक्सप्रेसचा वारंवार खोळंबा; पुलाचा प्रश्न कधी सुटणार?

    13 वर्षांपासून रखडलेला दिवा रेल्वे उड्डाणपूल, फाटकामुळे लोकल-एक्सप्रेसचा वारंवार खोळंबा; पुलाचा प्रश्न कधी सुटणार?

    Diva Junction Bridge: दिवा रेल्वे फाटकामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येत आहे. १३ वर्षांपासून रखडलेला दिवा रेल्वे उड्डाणपूल अद्याप अपूर्ण आहे. रेल्वे मंडळाने यावर तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई उपनगरी रेल्वेसह मेल-एक्स्प्रेस आणि मालवाहतूक रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकाला अडथळा ठरणाऱ्या दिवा रेल्वे फाटकावरून आता रेल्वे मंडळाने हस्तक्षेप सुरू केला आहे. तब्बल १३ वर्षांपासून रखडलेला दिवा रेल्वे उड्डाणपूल अद्याप अपूर्ण आहे. परिणामी रेल्वे फाटक सुरूच आहे. याची तातडीने दखल घेण्याच्या सूचना रेल्वे मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

    2012-13 मध्ये पुलाला मंजुरी

    दिवा रेल्वे स्थानकातील रेल्वे फाटक बंद करून त्याजागी पूल उभारण्याच्या प्रस्तावाला सन २०१२-१३ मध्ये मंजुरी देण्यात आली. उड्डाणपुलाचे रेल्वे रुळांवरील भागाचे काम पूर्ण झाले असून त्याला जोडणाऱ्या मार्गांचे काम अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण अशा अतिशय वर्दळीच्या मार्गावर दिवा रेल्वे फाटक आहे. १ जुलै २०२५ रोजी राज्य सरकारने पत्रातून राज्यात सुरू असलेल्या ३९ रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि दहा रुळांखालील ये-जा करण्याचा मार्ग (आरयूबी) प्रकल्पांबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले आहे.Maharashtra TimesDighi Port to Pune: रायगड-पुणे प्रवासात वेळ वाचणार? ताम्हिणी घाटासाठी दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित; 30 ते 50 किमी अंतर होणार कमी

    दिवा स्थानकाजवळील गेट क्रमांक २९ हा सर्वाधिक गर्दीचा आणि संवेदनशील बिंदू असल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधावे, असे पत्र तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश यादव यांनी तत्कालीन मुख्य सचिव, राज्य सरकार, राजेश मीना यांना पाठवले आहे. दिवा रेल्वे जंक्शनमधून धीम्या आणि जलद अप-डाउन लोकल, अप-डाउन मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्या त्याचबरोबर दिवा मेमू गाड्यांची वाहतूक केली जाते. अनेकदा रेल्वे फाटक खुले झाल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही वाहन कोंडी फुटेपर्यंत रेल्वेगाड्या खोळंबतात. रोज साधारण ३० ते ४० वेळा रेल्वे फाटकाची उघड-बंद होते.

    Maharashtra TimesMumbai Melody Road: दिवस-रात्र वाजणाऱ्या गाण्याने रहिवासी वैतागले, ‘मेलडी रोड’चा प्रयोग बनलाय त्रासदायक; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत…

    पत्रात काय?

    रुळांवरील भागाचे काम मार्च 2024मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम ठाणे महापालिकेकडून करण्यात येत आहे. भूसंपादनाच्या प्रश्नामुळे हे जोडमार्ग रखडले आहेत. या मार्गावर सतत वाहतूक सुरू असते. अशा स्थितीत रेल्वे फाटक बंद करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल लवकर सुरू होणे आवश्यक आहे. राज्य आणि महापालिकेच्या स्तरावर रेल्वे पूलाच्या जोडरस्त्यांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपदनासाठी तातडीने सूचना देऊन हा प्रश्न निकाली काढावा.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा