Amravati Student Assault : पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध करत दोन सख्ख्या भावांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
या प्रकरणी पोलिसांनी चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर (दोघेही रा. निर्मला कॉलनी, जुनीवस्ती, बडनेरा) या दोन भावांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकं काय घडलं?
तक्रारीनुसार, २६ मे २०२५ रोजी रहाटगाव येथील हॉटेलमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत चेतन आणि आकाश हे दोघेही सहभागी झाले होते. चेतनने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विद्यार्थिनीला पार्टीसाठी बोलावले. पार्टीदरम्यान तिच्या पेयात गुंगीचे औषध मिसळण्यात आले. पेय घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर हॉटेलमधील एका खोलीत चेतन अंबाडकर याने तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहे.
Pune News : मळणीयंत्रात केस अडकले, पुण्यात महिलेचा हृदयद्रावक अंत, वाढदिवशीच मृत्यूने गाठलं
आक्षेपार्ह व्हिडिओवरुन ब्लॅकमेल
या घटनेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी विद्यार्थिनीला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवत ५ लाख रुपयांची मागणीही केली. भीतीपोटी विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांपासून लपवून ठेवला. मात्र, मानसिक छळ असह्य झाल्यानंतर तिने अखेर धाडस दाखवत नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
माजी महापौराविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा
दुसरीकडे, अहिल्यानगरचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आपल्यावर पुणे आणि नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अनेकदा अत्याचार केल्याचे या २५ वर्षीय तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. नगरच्या ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्यात कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
Crime News : आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक, महाराष्ट्र सुन्न
पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, अभिषेक कळमकर यांनी आपल्याला शाळेत नोकरी लावून देतो, असे सांगितले होते. यातून विश्वास संपादन करून संपर्क वाढविला. त्यानंतर अत्याचार करण्यास सुरुवात केली. नगर शहरातील विविध ठिकाणी, पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केले. मोबाइलवर व्हिडीओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडले. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
महाराजांच्या शौर्याची कथा, अमोल कोल्हे भरभरून बोलले, भाषण ऐकून सारेच भारावले
