मस्साजोगमधील सरपंच प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत मोठी माहिती समोर येतेय. कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केला आहे. याबाबत कळताच मराठा नेते मनोज जरांगे यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ही गंभीर बाब असून देशमुखांच्या कुटुंबाला धोका असल्याचे जरांगे यांनी म्हटले. यावेळी मनोज जरांगे यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर देखील सडकून टीका केली.