• Fri. Mar 6th, 2026

    दहावीच्या पहिल्या पेपरला जाताना वडिलांचं निधन; डोळ्यात अश्रू, दुःख अनावर झालं तरी पोरीनं दिली परिक्षा, शहरात हळहळ

    दहावीच्या पहिल्या पेपरला जाताना वडिलांचं निधन; डोळ्यात अश्रू, दुःख अनावर झालं तरी पोरीनं दिली परिक्षा, शहरात हळहळ

    SSC Exams: काल महाराष्ट्रात दहावीच्या मुलांचा पहिला पेपर होता. वर्षभर मन लावून अभ्यास केल्या नंतर परिक्षेला निघताना एका विद्यार्थिनीला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळली. खचून न जाता तिने परिक्षा दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ऐन परीक्षा सुरू होताना एकाएकी दु:खाचा डोंगर कोसळला. परीक्षा द्यायला निघतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण ती खंबीर झाली आणि शुक्रवारी तिने दहावीचा पहिला पेपर सोडवला. तिच्या या धाडसाची शिक्षण क्षेत्रातून प्रशंसा केली जात आहे. धनश्री भिकाजी पवार असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

    परिक्षेला निघतानाच बातमी

    धनश्री पवार ही शरदचंद्र पवार प्रशालेत दहावीत शिकत होती. शुक्रवारी मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी दहा वाजता सोलापुरातील भू. म. पुल्ली कन्या प्रशाला केंद्रावर ती जाणार होती. परीक्षेला निघण्याच्या तयारीत असताना रुग्णालयात डायलिसेसचे उपचार घेत असलेले तिचे वडील भिकाजी पवार यांचे निधन झाले. हे ऐकून ती खचून गेली. अशा दुः खद प्रसंगात परीक्षा देण्याची तिची मानसिकता नव्हती. Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Accident: मोठ्या थाटामाटात झालं लग्न, पण पहाटे 3 वाजता वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात; 35 प्रवाशांसह टेम्पो उलटला

    धनश्रीच्या वडिलांची निधनाची माहिती शाळेतही पोहचली. शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी तिला धीर देत त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि परीक्षा देण्याची विनंती केली. तिला घरातून परीक्षा केंद्रावर पोहोचविले. हा धीर प्राप्त होताच तिने दु:ख बाजूला ठेवत पहिला मराठीचा पेपर दिला. परीक्षा देऊन झाल्यानंतर ती घरी गेली आणि वडिलांचे अंतिम दर्शन घेतले. धनश्रीचा पेपर संपेपर्यंत नातेवाईकांनी तिच्या वडिलांचे अंत्य विधीही थांबवले. धनश्री पेपर सोडवून घरी परतल्यानंतर तिच्या वडिलांवर अंत्यासंस्कार करण्यात आले.

    Maharashtra TimesMumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry: शिमग्याला कोकणात जाणं होणार सोपं, मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून; कसं असेल वेळापत्रत?

    मुख्याध्यापक केंद्रावर घेऊन गेले

    आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे दहावीची परीक्षा असते. दहावीची परीक्षा आयुष्याची दिशा ठरविणारी असते. धनश्री पवारने वर्षभर अभ्यास केला होता. सोलापूर शहरातील भू. म. पुल्ली कन्या प्रशाला केंद्रावर तिच्या स्वप्नांची पहिली पायरी उभी होती. पण नियतीने तिच्यावर संकटाचीच परीक्षा लादली. तिच्या वडिलांचे निधन झाले हे कळताच शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक व राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने तिच्या घरी गेले. घरातून तिला गाडीवर बसवून तिला परीक्षा केंद्रात आणले. तिला पेपर सोडविण्यासाठी केंद्रप्रमुख गीता सादूल यांनी धीर दिला.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा