• Fri. Mar 6th, 2026
    Mantralaya Bribe Case: गाडे यांचे नाव का लपवले? FDA लाचखोरी प्रकरणात तक्रारदारांचा आक्षेप

    Narhari Zirwal Mantralaya Bribe Case: मुंबईसह राज्यभरात औषधविक्रेत्यांकडे लाच मागण्यात आल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत. मागील तीन वर्षांपासून हे प्रकार वाढत आहेत.

    एफडीए लाच प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कारकुनाने लाच मागितल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, ‘मंत्र्यांचे सचिव रामदास गाडे यांच्यासोबत संभाषण झाले होते. यात त्यांनी ‘रक्कम कमी करण्यात येणार नाही’ असे स्पष्ट केले होते. याचे रेकॉर्डिंग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले होते. मग त्यांच्यावर कारवाई का झाली नाही?’ असा महत्त्वाचा प्रश्न दुसऱ्या एका तक्रारदाराने या प्रकरणी उपस्थित केला आहे.

    त्यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीची प्रत ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे आहे. या प्रकरणातील पूर्ण घटनाक्रम तक्रारदार हरिराम धांची यांनी सांगितला. अँन्टॉप हिल येथे धांची यांचे मेडिकल स्टोअर असून तिथे १० ऑक्टोबर २०२४ रोजी औषध निरीक्षक हेमंत आडे यांनी भेट दिली. १५ ऑक्टोबर रोजी या दुकानाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्या लेखी उत्तरावर समाधान न झाल्याने, २७ ऑक्टोबर रोजी औषधांचे दुकान बंद ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्णयाविरुद्ध त्यांनी मंत्र्यांकडे अपील दाखल केले. झिरवाळ यांचे सचिव रामदास गाडे; तसेच सहायक राजू ढेरिंगे यांच्याकडे २३ जानेवारी रोजी अपील दिले. त्यानंतर राजू यांनी तक्रारदाराकडे ‘स्थगिती आदेशा’ साठी ५० हजार रुपयांची मागणी केली.

    Maharashtra TimesCentral Railway: मध्य रेल्वेची मोठी कारवाई! वाठारमध्ये ‘तत्काळ’चा काळाबाजार उघड, दोघांना रंगेहाथ पकडलं
    गैरप्रकारांना चाप केव्हा?

    डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधविक्री केली जात नाही, मग हीच पारदर्शकता मंत्री का पाळत नाहीत? संबंधित विभागाचे मंत्री व त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांशी जवळीक वाढवण्यात अन्न व औषध निरीक्षकांचा वेळ जातो, मग ते अन्न व औषधांसंदर्भात पारदर्शकता कशी ठेवणार, असा प्रश्न औषधविक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.

    Maharashtra TimesPune News : शाळेत सोडण्याचा बहाणा, पुण्यात अल्पवयीन मुलीवर फॅमिली फ्रेण्डचा अत्याचार, डीपी रोडला कार थांबवली अन्…
    ‘दुकान बंद होईल, त्यामुळे नुकसान तसेच बदनामी होईल,’ या भीतीने याविषयी बोलण्यासाठी कोणी धजावत नाही. या गैरप्रकारांना केव्हा चाप लागणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा