• Fri. Mar 6th, 2026

    Beed Crime: ‘आता तुला सोडत नाही’; वृद्धाला चौकात मारहाण केली, व्हिडिओ काढला, सगल दोन दिवस जीवावरच उठला; एवढी दहशत…

    Beed Crime: ‘आता तुला सोडत नाही’; वृद्धाला चौकात मारहाण केली, व्हिडिओ काढला, सगल दोन दिवस जीवावरच उठला; एवढी दहशत…

    सहयोग नगर परिसरातील सर्वेश्वर मंदिराजवळ वयोवृद्धावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या विकी उर्फ पवन वीर याला पोलिसांनी ४८ तासांत अटक केली आहे. बीड पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचं कौतुक होत आहे.

    खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड: शहरातील सहयोग नगर परिसरात सर्वेश्वर मंदिराजवळ भरदिवसा झालेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपीला बीड शहर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनांक 15 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून बीड शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली की, सर्वेश्वर मंदिराजवळ चार महिला व एका पुरुषाने एका व्यक्तीस बेदम मारहाण केली आहे. माहिती मिळताच PSI संदीप नेवरे व PSI महेश जाधव हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

    तपासात काय समोर आले?

    तपासात समोर आले की, सदाशिव धोंडिबा कोकाट (रा. पांडुरंग नगर, बहिरवाडी, बीड) हे आपल्या मुलासोबत सामान्य रुग्णालयाकडे जात असताना दोन महिला आरोपींनी त्यांना अडवून मोटारसायकलची चावी काढून घेतली. वयोवृद्ध असल्याने पुढे जाऊ देण्यास विरोध करण्यात आला. त्यानंतर संबंधित महिलांनी प्रमुख आरोपीला घटनास्थळी बोलावून घेतले. सर्व आरोपींनी मिळून भर रस्त्यात कोकाट यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर बोथट वस्तूने वार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

    या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध झाल्याने गुन्हा नोंदविणे व पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत झाली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीही याच पीडितावर गंभीर हल्ला झाल्याची नोंद असून त्या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 326 अन्वये गुन्हा दाखल आहे.

    Maharashtra TimesCrime News : ‘कॉपी’ पकडली म्हणून गुरूवर संतापला, डॉक्टर विद्यार्थ्याचा राडा; वर्गातच प्राध्यापकावर बुक्क्यांचा वर्षाव, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

    आरोपी अटक

    सलग दोन दिवस सार्वजनिक ठिकाणी गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्याने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून भारतीय दंड विधान कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकी उर्फ पवन किशोर वीर (रा. नवनाथ नगर, MIDC, बीड) यास 48 तासांच्या आत अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षी व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

    Maharashtra TimesKolhapur Crime: ‘तुझ्या बहि‍णीचा कॅन्सर ठीक करतो’ म्हणत लॉजवर नेलं, औषधाच्या बहाण्याने भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार

    ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुढील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा