Pune Crime News: फरार असलेल्या तरुणी आणि तरुणीला पोलिसांकडून आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. न्यायालयात याप्रकरणी नेमकं काय घडतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने आपण स्वतःच्या इच्छेने घरातून निघून गेल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. तसंच कोणत्याही प्रकारची जबरदस्ती अथवा अपहरण झालं नसल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. या जबाबानंतर सदर प्रकरणाला नवं वळण मिळालं असून, पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवत आहेत. तरुणीच्या जबाबाची नोंद घेऊन तपासाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या जबाबामुळे घटनेला नाट्यमय वळण लागलं असून परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत असून तरुणी-तरुणीला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे न्यायालयात नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी भिगवण परिसरात आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात असताना दोन तरुणांनी तरुणीची अपहरण केल्याची घटना घडल्याचे सांगण्यात आले होते. आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून मुलीला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यामध्ये तिने स्वतःच्या इच्छेने तरुणासोबत गेल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, “माझे आणि या तरुणाचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असून त्याने मला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही. मी माझ्या मनाने त्याच्यासोबत निघून आले आहे,” असं तरुणीने यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं.
