Nagpur SSC Student Death: पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्याची आई जखमी झाली आहे.
नेमकं काय घडलं?
अथर्व चंद्रशेखर मेश्राम (वय १६) असे मृताचे तर रीना चंद्रशेखर मेश्राम (वय ४०, दोन्ही रा. चंद्रमणीनगर, रामेश्वरी रोड) असे जखमीचे नाव आहे. अथर्व दहावीत होता. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अथर्वला कामठी मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूल हे परीक्षा केंद्र मिळाले. मंगळवारी त्याने पेपर दिला. दुपारी २ वाजताच्या सुमारास रीना या त्याला घेऊन एमएच-४९-एएम-८९८४ या क्रमांकाच्या मोपेडने घरी जात होत्या. पिवळी नदी परिसरातील पार्किंग प्लाझासमोर मागाहून भरधाव आलेल्या ट्रकने मोपेडला धडक दिली. खाली पडून दोघेही जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला.
Nagpur Crime: नऊ महिने पोटात वाढवलं, अन् आठव्या महिन्यात कचऱ्यात फेकलं; चिमुकलीचा निर्दयी अंत; नागपुरातला अमानुष प्रकार
घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अथर्वला मृत घोषित केले. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे.
Nagpur Accident : कबड्डीपटूंना बुलेट स्टंटबाजी नडली, बेफाम वेगाने मृत्यू, मैदान गाजवलं पण रस्त्यावर हरले; दोघांचा करुण अंत, एक युवती…
रीना जबर धक्क्यात
अपघातात रीना या किरकोळ जखमी झाल्या. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यांनी अथर्वबाबत विचारणा केली. त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळाले. रिना यांनी धाय मोकलून रडायला सुरुवात केली. अथर्वच्या मृत्यूचा जबर धक्का त्यांना बसला. अथर्वचे वडील चंद्रशेखर हे पॉवरग्रीडच्या कॅन्टीनमध्ये काम करतात. त्याचा मोठा भाऊ शिक्षण घेत आहेत. अथर्वच्या मृत्यूने मेश्राम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
