नांदेडच्या सावळेश्वर गावातील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, उस्माननगर पोलिसांनी झारखंडमधून ५ आरोपींना अटक केली आहे.
उस्माननगर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तसेच गोपनीय माहितीच्या आधारे झारखंड राज्यातील रांची जिल्हयातील गढवा येथे जाऊन वरील गुन्हयाच्या संबंधाने तपास करत संशयित आरोपीतांचा सहभाग निष्पन्न झाल्याने अटक केली. न्यायालयात हजर करून गुन्हयाचे संबंधाने पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास लोहा ठाण्याचे पोलीस निरिक्षक एन. एस. आयलाने हे करीत आहेत. दरम्यान बोगस जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली होती..
नेमकं काय आहे प्रकरण?
कंधार तालुक्यातील सावळेश्वर गावाची मूळ लोकसंख्या केवळ 1 हजार 700 इतकी आहे. मे 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत तब्बल 15569 नावे जन्म नोंदणीमध्ये वाढवण्यात आल्याचे उघड झाले. Add old event या टॅबचा वापर करून (CRS) पोर्टल युजर आयडी MH20362RE च्या गैरप्रकारने ऑनलाईन पध्दतीने वापर करून १५५६९ ऑनलाईन बनावट जन्म नोंदणी करनण्यात आली. फसवणूकीचा प्रकार समजल्यानंतर उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Jay Pawar: ‘ब्लॅक बॉक्स इतक्या सहज नष्ट होत नाही’; अजित पवार अपघातावर जय पवारांचे गंभीर प्रश्न
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती भेट
दरम्यान हा घोटाळा उघड झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सावळेश्वर ग्राम पंचायतीला भेट देऊन माहिती घेतली होती . त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याना भेटून कारवाईची मागणी केली. या प्रकरणात सहा राज्यांमध्ये कार्यरत असलेली एक मोठी गँग सहभागी असल्याचा सोमय्या यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील चार ठिकाणी आणि महाराष्ट्रातील सहा ठिकाणी बोगस नोंदी करून जन्म प्रमाणपत्रे मिळवण्यात आली आहेत.
ही गँग पाचहून अधिक राज्यांमध्ये कार्यरत असून या घोटाळ्यासाठी परदेशातून आर्थिक मदत येत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
