Mumbai News: कुलाब्यात पर्यटकांसाठी एक नवीन ‘वॉकिंग प्लाझा’ तयार होत आहे. मुंबई महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला असून, तो अंतिम टप्प्यात आहे. या प्लाझामुळे पर्यटकांना दक्षिण मुंबईत आरामात फिरता येईल.
काय बदलणार?
प्लाझामध्ये प्रस्तावित जागेवरील रस्ते व पदपथावरील तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामे, अतिक्रमणे हटविणे, स्टँम्प कॉंक्रीटचे पदपथ करून सुशोभिकरण करणे, थ्री डी पेंटिंग करणे, दिशादर्शक फलक लावणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच या पट्ट्यात शोभिवंत रोपे व झाडेही लावण्यात येणार आहेत.
Bellasis Bridge: ‘उद्घाटन मंत्र्यांच्याच हस्ते होणार!’, बेलासिस उड्डाणपुलाचं काम विक्रमी वेळेत पूर्ण; तरीही मुंबईकरांच्या सेवेत नाही
वॉकिंग प्लाझासाठी निवडण्यात आलेला रस्ता नेहमीच वाहने व पादचाऱ्यांनी गजबजलेला असतो. स्वतंत्र मार्ग झाल्यानंतर पर्यटकांना दक्षिण मुंबईतील या पट्ट्यातून आरामात फेरफटका मारता येणार असल्याचा दावा ए वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
ST Bus: स्वारगेट बस स्थानाकात महिलेवर अत्याचार, एका वर्षानंतर महामंडळाला आली जाग; आता 7000 सीसीटीव्ही बसवणार; कुठे?
माहिती फलकही लावणार
वॉकिंग प्लाझावर कोणत्याही प्रकारचे बेकायदा फेरीवाले व अतिक्रमण होऊ नये, यासाठी महापालिकेकडून देखरेख ठेवण्यात येत आहे. परिसरातील रस्ते व पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना मिळावी, यासाठी माहिती फलक लावण्याचे काम सुरू आहे. या प्लाझाला समांतर अशी रेल्वे कॉलनीची भिंत असून, त्यावर आकर्षक पेंटिग करण्याचे नियोजन आहे. वॉक वेच्या पट्ट्यात आसन व्यवस्था करण्याचाही विचार होता. मात्र बेघर, गद्दुल्ले आदींकडून त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने आसन व्यवस्था न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वॉक वेचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कुलाब्यातील आणखी काही भागात अशा प्रकारचा वॉक वे विकसित करण्याचा विचार केला जात आहे.
