• Fri. Mar 6th, 2026
    किचनमध्ये काम करताना खुर्चीवरुन पडल्या, पुण्यात महिलेचा मृत्यू, मुलगी धावत आली अन्…

    Pune Woman Death : स्वयंपाकघरात खुर्चीवर उभ्या राहून पाइप पाण्याच्या टाकीतून काढत असताना खुर्ची सरकली आणि महिला ओट्यावर जोरात आपटली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : येरवडा लक्ष्मीनगर परिसरात कुमार पर्णकुटी सोसायटीमध्ये स्वयंपाकघरात काम करीत असताना खुर्चीवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

    नेमकं काय घडलं?

    पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर प्रथमदर्शनी अपघात झाल्याचे दिसत आहे. ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर अपघात की घातपात, हे स्पष्ट होणार आहे. अंजुम इस्माइल कुरेशी (४२, कुमार पर्णकुटी, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.सोसायटीमध्ये मागील काही काळापासून पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांना वेगवेगळ्या मार्गाने पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. कुरेश, त्यांची मुलगी घरात होते. कुरेशी स्वयंपाकघरात खुर्चीवर उभ्या राहून पाइप पाण्याच्या टाकीतून काढत होत्या. त्यावेळी खुर्ची सरकली आणि ओट्यावर जोरात आपटल्या. मानेला जोराचा मार बसल्याने त्या जागीच मृत्यू झाला. पडल्याचा आवाज आल्याने मुलगी धावून आल्यावर आई पडलेली दिसली. मुलीने शेजाऱ्यांना माहिती दिल्यावर पोलिसांना कळविण्यात आले.
    Maharashtra TimesSahil Dhaneshra : रील शूट करताना धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अल्पवयीन आरोपी दहावीच्या परीक्षेसाठी जामिनावर, हतबल आई रडत म्हणाली…

    नऱ्हेत चारचाकी अंगावरून गेल्याने तरुण जखमी

    दुसरीकडे, सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे गाव परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आणि खड्ड्यामुळे एक तरुण दुचाकीवरून घसरून रस्त्यावर पडला. त्याच वेळी मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याला चुकवण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहन त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. संतोष कानामुद्रा (वय ३६ रा. रॅली कोन विश्व, नऱ्हे) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
    Maharashtra TimesMumbai Crime : चुलतभावाचा जीव घेतल्याबद्दल आजन्म सक्तमजुरीची शिक्षा, सात वर्षांनी निर्दोष मुक्तता, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
    चेंबरमधील मैलापाणी रस्त्यावर वाहत असल्याने आणि रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून जखमीला रुग्णालयात हलवले. संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही चेंबर ओव्हरफ्लो आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांनी तत्काळ दुरुस्ती करून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी केली आहे.

    किशोरी पेडणेकरांची मातोश्रीकडून फसवणूक? विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवर संतोष धुरींचा खोचक टोला

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा