• Mon. Mar 9th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar Crime : ‘माझ्याशी बोल, नाहीतर फोटो मॉर्फ करून व्हायरल करीन’, तरुणीचा पाठलाग करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

    Chhatrapati Sambhajinagar Crime : ‘माझ्याशी बोल, नाहीतर फोटो मॉर्फ करून व्हायरल करीन’, तरुणीचा पाठलाग करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

    छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीचा विनयभंग करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा आरोपी मुलीला फोटो मॉर्फ करुन व्हायरल करण्याची धमकी द्यायचा.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : राज्यात महिला आणि मुलीच्या सुरक्षेच्या प्रश्न वारंवार समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक विकृत तरुण हा शालेय तरुणाला रस्त्यात अडून सारखा विनयभंग करायचा, पीडितेला त्रास द्यायचा. अखेर वैतागून अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपी तरुणीचा विनयभंग करून तिला सोशल मीडियावर बदनामीची धमकी द्यायचा. त्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी आरोपी विरोधात सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. “माझ्याशी बोल, नाहीतर एआयचा वापर करून तुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करीन”, अशी धक्कादायक धमकी या नराधमाने तरुणीला दिली होती.

    आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेते. आरोपी हा गेल्या डिसेंबर 2025 पासून या तरुणीचा सातत्याने पाठलाग करत होता. “तू मला आवडतेस, तू माझ्याशी का बोलत नाहीस?”, असे म्हणत त्याने वेळोवेळी तिची वाट अडवून विनयभंग केला.

    तरुणीने वारंवार दुर्लक्ष केल्याने आरोपीने तिला थेट धमकावण्यास सुरुवात केली. जर तू माझ्याशी बोलली नाहीस, तर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तुझे बनावट फोटो तयार करीन आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करून तुला बदनाम करीन असे त्याने तिला बजावले होते. या सततच्या त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीने पीडित तरुणी प्रचंड दडपणाखाली होती.

    पोलिसांची मोठी कारवाई

    अखेर या त्रासाला कंटाळून तरुणीने सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी विरुद्ध विनयभंग आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बुरूड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी काय कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा