मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फुटपाथवरील अतिक्रमणावरुन नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे न्यायालयाने पाहणीसाठी एक समितीदेखील नेमली आहे.
प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : “शहरातील बहुतांश फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. सर्वसाधारण पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच नाहीये. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जरा खामला परिसरात फिरून यावे, मग त्यांना खरी परिस्थिती कळेल”, अशी मौखिक नाराजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली. अलीकडेच झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये नागपूर शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी सार्वजनिक सुविधांची सुलभता सुनिश्चित करण्यासंदर्भातील प्रकाश अंधारे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. आज सोमवारी न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर आणि राज वाकोडे यांच्या खंडपीठासमक्ष या प्रकरणी सुनावणी झाली.
यावेळी अंधारे यांच्या वकील सेजल लाखानी यांनी या प्रकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी न्यायालयाची अनुमती मागीतली. त्यानुसार, शहरात दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. लाखानी यांनी न्यायालयाला सांगितले, शहरातील एकही पदपथ किंवा बसथांबा दिव्यांगांसाठी पूर्णतः सुसंगत नाही.
कर्ब रॅम्प आणि अडथळामुक्त प्रवेशाच्या सुविधांचा अभाव असल्याने व्हीलचेअरधारकांसाठी शहरातील सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रत्यक्षात वापरण्यायोग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. हा मुद्दा याचिकेत समाविष्ठ करून याचिकेची व्याप्त वाढवू देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करीत याचिकेत आवश्यक ती सुधारणा करण्याची परवानगी दिली. त्यासाठी त्यांना एक आठवड्याचा कालावधी देण्यात आला.
दिव्यांग सुविधेची माहिती द्या
यावेळी न्यायालयाने खामला परिसरातील स्थितीवर वरील प्रमाणे मौखिक भाष्य करीत मनपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच शहरातील किती बस थांबे, फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांना सुविधा पुरविल्या आहेत याची यादी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मनपाला दिले. यासाठीला मनपाला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला. याखेरीज या सर्व ठिकाणांची तसेच शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणांची निष्पक्ष पाहणी करण्यासाठी न्यायालयाने एक सदस्यीय समिती नेमली. यात ॲड. अनिश कठाणेंची नियुक्ती करून त्यांनाही दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा