• Mon. Mar 16th, 2026

    Western Railways: मुंबईत रेल्वे स्थानकांचा कायापालट! नवे पूल, सरकते जिने आणि आधुनिक सुविधा; मुंबई सेंट्रलसह दोन स्थानकांचा समावेश

    Western Railways: मुंबईत रेल्वे स्थानकांचा कायापालट! नवे पूल, सरकते जिने आणि आधुनिक सुविधा; मुंबई सेंट्रलसह दोन स्थानकांचा समावेश

    Mumbai Central Railway Station: मुंबई लोकलच्या महत्त्वाच्या तीन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या स्थानकांचा विकास होणार आहे. यावेळी स्थानकांना जोडणारे पादचारी पूल, सरकते जिने आणि आधुनिक सुविधा सुरु करणार आहेत.

    मुंबई: मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. मुख्य तीन स्थानकांवर नव्या सुविधा सुरु करणार असून, स्थानकांचं रुप बदलणार आहे. यामुळे प्रवाशांना स्थानकांवर मोकळी जागा मिळणार असून फेरीवाल्यांपासून सुटका होणार आहे. पश्चिम रेल्वेने सोमवारी याबद्दल माहिती दिली.

    कोणत्या स्थानकांचा कायापालट?

    पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड आणि चरणी रोड या रेल्वे स्थानकांवर सुधारणा करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी याबद्दल माहिती दिली आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात यांनी सोमवारी चर्चगेट येथील मुख्यालयात यांची भेट घेऊन रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना होणार्‍या समस्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी स्थानकांवरील पादचारी पूल, फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय, प्रवेशमार्गांची सुधारणा अशा समस्यांवर चर्चा केली.Maharashtra TimesMumbai Water Metro: डिसेंबरपासून मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’, मंत्री नितेश राणेंचा गेमचेंजर प्लॅन; नरिमन पॉइंट, वर्सोवा… कसे असतील 8 मार्ग?

    कसं-काय बदलणार?

    मुंबई सेंट्रल स्थानकावर पश्चिम रेल्वेसह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्याही सुटतात. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. प्रवाशांसाठी नवे सरकते जिने, लिफ्ट व सुरतक्षित व सुलभ प्रवासासठी अनेक आधुनिक सुविदा सुरु करण्याची मागणी केली. शिवाय गिरगावला चरणी रोड स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पूलाचं काम अपूर्ण आहे. ते काम लवकरात-लवकर पूर्ण करण्याची मागणीही यावेळी केली. त्यासोबत, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करण्यास मदत व्हावी म्हणून सरकते जिने (Escalators) सुरु करण्याचा सल्ला ही त्यांनी या बैठकीत दिला.

    Maharashtra TimesKonkan Railways: शिमग्याला कोकणात जाताय? होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या; मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी-कुठे?

    तसेच, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानक आणि परिसरातील ठिकाणांवर अधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यांच्यावर कारवाई करून हे परिसर नागरिकांसाठी मोकळे करण्याचीही त्यांनी यावेळी मागणी केली. विजय कुमार यांनी या सर्व समस्यांची दखल घेऊन यासंदर्भा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर या नवीन प्रकल्प सुरु करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. या नव्या सुविधांमुळे मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे. रेल्वे स्थानकावर सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना या जिने आणि पुलांचा फायदा होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा