• Sun. Mar 8th, 2026
    Ajit Pawar Statue: अजितदादांचा ‘अजरामर’ ठसा; बारामतीत उभारणार 10 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा

    Baramati Ajit Pawar Statue: लवकरच पुतळा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली आहे.

    अजित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, बारामती: बारामतीच्या विकासाचा चेहरा ठरलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘अजरामर’ होणार आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून दहा फूट उंचीचा ब्राँझ धातूतील पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नटराज नाट्य कला मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

    अजित पवार यांच्या कार्यशैलीची ठाम छाप, विकासकामांतील वेग आणि बारामतीकरांशी असलेले घट्ट नाते याची कायमस्वरूपी आठवण म्हणून हा पुतळा उभारला जाणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की पुतळ्याची रचना प्रभावी आणि वास्तवदर्शी असणार असून, ब्राँझ धातुमुळे त्याला दीर्घायुष्य लाभणार आहे. पुतळ्यासाठी शहरातील तिरंगा चौक या प्रमुख ठिकाणाची निवड करण्यात आली आहे.

    Maharashtra TimesMD Drugs Seized: पुणे पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; तब्बल 3.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, सहा जणांना अटक
    पुतळ्याची वैशिष्ट्ये
    उंची: १० फूट
    धातू : ब्राँझ
    प्रकार : पूर्णाकृती
    पुढाकार : नटराज नाट्य कला मंडळ
    उद्देश : दादांच्या विकासकार्याची कायमस्वरूपी स्मृती

    Maharashtra TimesBaramati Crime: तरुणीची स्कुटी अडवली, जबरदस्तीने घरी नेलं आणि…; बारामतीत संतापजनक घटना, तरुणाला पोलिसांचा दणका!
    ‘दादा’ ही केवळ राजकीय ओळख नव्हती, तर बारामतीकरांच्या मनातील विश्वासाचे प्रतीक होते. त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही अस्वस्थ करते. अशा वेळी उभारला जाणारा हा पूर्णाकृती पुतळा केवळ धातूचा पुतळा नसून, विकासाच्या प्रवासातील एका अध्यायाची जपलेली स्मृती ठरणार आहे. – किरण गुजर

    अल्पसंख्याक प्रमाणपत्रे देण्यावरून वादंग
    माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशीच अल्पसंख्याक विकास विभागातून अनेक संस्थांना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचा दर्जा दिल्यावरून वादंग निर्माण झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून ही प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप केला जात असताना या विभागाने मात्र तांत्रिक अडचणींमुळे अडकलेली प्रमाणपत्रे योगायोगाने त्याच दिवशी जारी झाल्याचा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी दुपारी ३ वाजता एक प्रमाणपत्र जारी करण्यात आले. कार्यालयाच्या वेळेनंतरही प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला होता.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा