• Mon. Sep 7th, 2026
Nashik | पत्रकारांच्या प्रश्नांवर किरीट सोमय्या संतापले, वादानंतर पत्रकार परिषद गुंडाळली

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मालेगावातून बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांना बनावट जन्म दाखले दिल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी पाठपुरावा केला. एसआयटी चौकशीनंतर मालेगावातून ३९७७ नोंदी रद्द करण्यात आल्या. त्यानंतर आता सोमय्यांनी त्यांचा मोर्चा नाशिककडे वळवला. किरीट सोमय्या यांनी नाशिक महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार आणि सोमय्या यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिक शहरात २०१६ नंतर जन्म नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानंतर काढण्यात आलेल्या १८ हजार जन्म दाखल्यावर संशय व्यक्त करत सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed