• Fri. Mar 6th, 2026
    आठ दिवस कडक उपवास, अन्नाचा घास घेण्याआधी काळाचा घाला; भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

    Jalgaon News : अपघात झालेले पाचही तरुण अत्यंत श्रद्धाळू होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी कडक उपवास धरला होता, त्यांनी घरात अन्न आणि पाणी देखील प्राशन केले नव्हते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा- विरवाडे रस्त्यावर एका धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या तरुणांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही भरधाव कार दुभाजकावर धडकली. सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या भीषण अपघातात कारमधील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन जण गंभीर जखमी झालेत. राहुल अमृत भोई आणि मयुर अरुण राजपूत अशी मृत तरुणांची नावे आहेत. हृदयद्रावक बाब ही की, आठ दिवसांपासून त्यांनी कडक उपवास धरला होता, शेवटच्या दिवशी कार्यक्रम आटोपून ते अन्नाचा घास घेणार होते, मात्र त्याआधीच नियतीने घाला घातला.

    काय झालं नेमकं?

    चोपडा तालुक्यातील पाच तरुण हे गेल्या आठ दिवसांपासून एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत होते. आज कार्यक्रमाचा अखेरचा दिवस होता. त्यात सहभाग घेण्यासाठी तरुण विरवाडे येथून चोपड्याकडे एर्टीगा कार (एम.एच.१९ बी.एस.१००८) ने येत होते. पहाटे साडेपाच वाजता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार चोपड्याजवळ एका दुभाजकावर धडकली. ही धडक इतकी भीषण होती. त्यात कार चक्काचूर झाली.
    Maharashtra TimesBaramati Crime : आई मला माफ कर, त्या ब्लॅकमेल करतायत; बारामतीत युवकाने आयुष्य संपवलं, पुण्यातील दोन बहिणींवर गुन्हा

    दोघांचा जागीच मृत्यू

    या अपघातात राहुल आणि मयुर यांचा जागीच मृत्यू झाला तर विजय अमृत भोई (वय ३५), राकू राजपूत (वय ३०) आणि बंटी कोळी (वय ३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. विजय भोई यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर राकू राजपूत आणि बंटी कोळी यांच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चोपडा येथील मोरेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    Maharashtra TimesCrime News : बालमैत्रिणीने फसवलं, दोन ‘राहुल’ करिश्माच्या मृत्यूस कारणीभूत, 23 वर्षीय तरुणीच्या कुटुंबाचे धक्कादायक आरोप

    नातेवाईकांचा हृदयद्रावक आक्रोश

    हे पाचही तरुण अत्यंत श्रद्धाळू होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी कडक उपवास धरला होता, त्यांनी घराचे अन्न व पाणी देखील प्राशन केले नव्हते. आज शेवटच्या दिवशी कार्यक्रम आटोपून ते अन्नाचा घास घेणार होते, मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

    Amit Satam | संजय राऊतांचा विदूषक उल्लेख, सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध माफीची मागणी

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा