• Fri. Mar 6th, 2026
    Harshwardhan Sapkal: खुशाल जीभ कापा, मी थांबणार नाही; टिपू सुलतानच्या मुद्यावरुन सपकाळ यांचे प्रतिआव्हान

    Harshwardhan Sapkal: माझी जीभ कापायची तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपचा पर्दाफाश करणारच, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

    हर्षवर्धन सपकाळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सूलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही.

    ‘अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी उघडे पाडतो म्हणून भाजपला माझी जीभ कापायची असेल, तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार,’ अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोमवारी मांडली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    Maharashtra TimesNCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, येत्या 10 दिवसात महत्त्वाच्या हालचाली घडणार
    ‘माझी जीभ कापून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, हा अन्यायकारक व्यापार करार रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असेल, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल, तर माझी जीभ नक्की कापा,’ असे ते यावेळी म्हणाले.

    अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, राज्यघटना बदलू पाहणाऱ्या भाजपला मी उघडे पाडतो म्हणून भाजपला माझी जीभ कापायची असेल, तर खुशाल कापा; पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार. –हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

    Maharashtra TimesNarhari Zirwal : नॉट रिचेबल मंत्री ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
    टिपू सुलतान प्रतिमेवरुन पुन्हा वाद

    मालेगाव : महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यावरून पुन्हा वाद पेटला आहे. उपमहापौर शान-ए-हिंद आपल्या भूमिकेवर ठाम असून, दालनाच्या दुरुस्ती कामांनंतर प्रतिमा पुन्हा लावणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वादग्रस्त वक्तव्याची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन, खबरदारी म्हणून राज्य सरकारचे महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याबाबतच्या नियमांचे पत्र उपमहापौरांना सोमवारी दिले. संबंधित प्रतिमा पुन्हा लावल्यास सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, सोशल मीडियावर व राज्यस्तरावर या प्रतिमा प्रकरणावरून जोरदार निषेध व टीका केली जात आहे. गेल्या आठवड्यात उपमहापौर शान-ए-हिंद यांनी पदभार घेतल्यानंतर काही कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांना टिपू सुलतानची प्रतिमा भेट दिली होती. त्यांनी ही प्रतिमा त्यांच्या दालनात दर्शनी भागात लावली होती. यानंतर शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनांनी आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेऊन प्रतिमा हटविण्याची मागणी केली होती

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा