छत्रपती संभाजीनगरच्या नारळीबाग परिसरात एका विवाहित महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अश्लील मागणी करत महिलेचा रस्ता अडवणाऱ्यादोन आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सायंकाळच्या वेळी हॉस्पिटलला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी आरोपी सचिन सोनवणे याने महिलेचा रस्ता अडवला आणि “तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या घरात येऊ का?” असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने या कृत्याला स्पष्ट शब्दात नकार दिला असता, आरोपीने बळजबरीने तिचा हात धरून विनयभंग केला. हा प्रकार घडताच पीडितेने आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली.
Tejas Thackeray यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु, उद्धव ठाकरेंची डॉक्टरांशी चर्चा, आता कशी आहे तेजसची प्रकृती?
मदत करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही शिवीगाळ….
पीडितेचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिची भावजय तातडीने घराबाहेर आली. तिने आरोपीला समज देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी सचिन आणि त्याचा साथीदार राजू सोनवणे यांनी कोणताही संकोच न बाळगता पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पीडितेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, येत्या 10 दिवसात महत्त्वाच्या हालचाली घडणार
पोलीस कारवाई आणि तपास….
महिलेच्या फिर्यादीवरून सिटीचौक पोलिसांनी सचिन सोनवणे आणि राजू सोनवणे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मिसाळ पुढील तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
