उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली. सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर ही बैठक बोलावण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे दर आठवड्याला सर्व आमदार आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घ्यायचे. अगदी तशीच बैठक सुनेत्रा पवार यांनी बोलावली. अशाप्रकारची बैठक सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्याची ही पहिलीच वेळ होती. सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा पार पडल्याची माहिती आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख ठरली आहे. येत्या 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार पडणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बोट दाखवले होते. पण याबाबत राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांना पाहून प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर येत आपण राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच आपण राष्ट्रीय अध्यक्ष होणार नसल्याचंदेखील प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं होतं. यानंतर सुनेत्रा पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानुसारच आता घडामोडी घडत असल्याचं बघायला मिळत आहेत.
बैठकीत काय घडलं?
दरम्यान, आज पार पडलेल्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर सर्व आमदारांनी त्यांच्या प्रस्तावाला समर्थन दिलं. त्यामुळे त्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची औपचारिकता येत्या 26 फेब्रुवारीला पूर्ण होणार असल्याचीदेखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नरहरी झिरवळ बैठकीला उपस्थित
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात काम करणाऱ्या कारकुनाला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं होतं. या घटनेमुळे नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. तेव्हापासून नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल होते. पण ते आज पक्षाच्या बैठकीला हजर होते. तसेच ते उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार असल्याची देखील माहिती आता समोर आली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा