• Fri. Mar 6th, 2026

    Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला उदंड प्रतिसाद, आता दुसर्‍या टप्प्याची तयारी सुरु; नवा रनवे, टर्मिनल… कसा होणार विस्तार?

    Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला उदंड प्रतिसाद, आता दुसर्‍या टप्प्याची तयारी सुरु; नवा रनवे, टर्मिनल… कसा होणार विस्तार?

    Navi Mumbai International Airport: नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये विमानतळाचा विस्तार होऊन प्रवासी आणि उड्डाणांची संख्याही वाढणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी मुंबई: नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात होऊन आता दोन महिने पूर्ण होतील. फक्त 19 दिवसांत, 12 जानेवारीपर्यंत विमानतळावर 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामुळे विमानतळाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे हे दिसत आहे. यामुळे नवी मुंबई विमानतळावर दुसर्‍या टप्प्यातील कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. यामुळे विमानतळाचा विस्तार होऊन मुंबई, ठामे, नवी मुंबईतील प्रवाशांना फायदा होणार आहे.

    1 फेब्रुवारीपासून नवी मुंबई विमानतलावर 24 तास विमान सेवांना सुरुवात झाली. परंतु, वेळापत्रकात फारसा काही बदल केला गेला नाही. सकाळी 8 आणि रात्री 9 नंतर असे प्रत्येकी दोन उड्डाणांची वाढ करण्यात आली आहे. पण येत्या जून महिन्यापासून अंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai News: ठाणे-वाशी मार्गावरील रेल्वे स्थानक बकाल, दररोज कामगार, स्थानिकांची ये-जा; तरी बंद पंखे, कचरा, सांडपाण्याच्या समस्या

    कसा होणार विस्तार?

    सध्या पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळावर 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. सध्या या विमानतळावर एक टर्मिनल आणि एक रनवे आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानतळावर दुसरा रनवे उभारण्याची योजना आहे. यामुळे प्रवासी संख्या 6 – 6.5 कोटी इतकी होण्याची शक्यता आहे. या कामाला 2026चा पावसाळा संपताच सुरुवात होणार आहे. 2029-30 पर्यंत ही काम पूर्ण करण्याचं उद्दिष्टहे. काम पूर्ण होताच नवी मुंबई विमानतळावर T1 आणि T2 असे दोन टर्मिनल कार्यन्वित होणार आहेत. तसेच या दोन टर्मिनलसह, नवीन तयार होणाऱ्या मेट्रोला जोडण्यासाठी ऑटोमेटेड पीपल मुव्हर (APMs) बसवण्यात येणार आहेत.

    Maharashtra TimesThane Coastal Road: ठाण्याच्या खाडीवर बनवणार कोस्टल रोड, आठ महिन्यांत मोठा टप्पा पूर्ण; थेट वाढवण बंदर, कर्नाटक पोहचवणार मार्ग, पाहा Video

    सध्या कोणत्या सेवा सुरु?

    ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड’ (AAHL) नवी मुंबई विमानतळाचा विस्तार करणार आहे. यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज अंतराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. सध्या नवी मुंबई विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, अकासा एअर, स्पाईस जेट आणि स्टार एअर या कंपन्यांकडून उड्डाणांना सुरुवात करण्यात आली आहे.

    येत्या मे महिन्यापासून नवी मुंबई विमानतळावर 5 मालवाहतूक कंपन्यांकडून मालवाहतूकीच्या सेवांना सुरुवात होणार आहे. मुंबई विमानतळावर 1 ऑगस्टपासून मर्यादीत काळासाठी मालवाहतूक बंद करण्यात येणार असून, नवी मुंबई विमानतळ आता एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा