• Sat. Jun 6th, 2026

    Maharashtra Weather: मुंबईत तापमानात सतत वाढ, रायगड, रत्नागिरीला आज ‘यलो ॲलर्ट’; पारा 37 अंशांपर्यंत चढणार?

    Maharashtra Weather: मुंबईत तापमानात सतत वाढ, रायगड, रत्नागिरीला आज ‘यलो ॲलर्ट’; पारा 37 अंशांपर्यंत चढणार?

    Weather Alert: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज उष्मा आणि आर्द्रतेचा ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यात हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे ऋतुबदल सुरू झाले आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले गेले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरात आता हिवाळ्याकडून उन्हाळ्याच्या दिशेने ऋतुबदलाला सुरुवात झाली आहे. वाऱ्यांची दिशाही बदलत असून, तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज, सोमवारी तुरळक ठिकाणी उष्मा आणि आर्द्रतापूर्ण वातावरणाचा ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. राज्यात दिवसभरात मुंबईत सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले.

    रत्नागिरीमध्ये रविवारी ३४.७ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. ते सरासरीपेक्षा ३.१ अंश अधिक होते. हर्णे येथे तापमानाचा पारा फारसा चढा नव्हता, मात्र येथे सकाळी ९७ टक्के, तर संध्याकाळी ७७ टक्के आर्द्रता नोंदली गेली. मुंबईतही कुलाबा येथे ९१, तर सांताक्रूझ येथे ८१ टक्के आर्द्रता रविवारी नोंदली गेली. मुंबईमध्ये दुपारनंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी होते; परंतु पारा चढा होता. सांताक्रूझ येथे ३५.२ अंश से., तर कुलाबा येथे ३३ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. हे सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.६ आणि २.८ अंशांनी अधिक होते.

    Maharashtra TimesMumbai Local Ticket: 10 वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेला UTS होणार बंद, लोकल तिकिटांसाठी नवा पर्याय; प्रवाशांसाठी काय सुविधा?

    मुंबईमध्ये कसं असेल तापमान?

    मुंबईमध्ये सोमवारीही कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास असेल, असा अंदाज आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळी आभाळ अंशतः ढगाळ असू शकेल. १७ फेब्रुवारी रोजीही आभाळ अंशतः ढगाळ असेल. मुंबईमध्ये आर्द्रता वाढल्याने किमान तापमानाचा पाराही चढला आहे. सांताक्रूझ येथे २१, तर कुलाबा येथे रविवारी २२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे किमान तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे २.६ आणि २.७ अंशांनी अधिक होते.

    Sanjay Raut | पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानते, मग त्यांच्याशी का सामना खेळता? राऊतांचा सवाल

    पुढील 48 तास महत्त्वाचे

    पुढील ४८ तासांमध्ये कोकण विभागात कमाल तापमानामध्ये एक ते दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यापुढील चार दिवस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. या दिवसांमध्ये कोकणाच्या काही भागांमध्ये ३५ ते ३७ अंशांपर्यंत तापमान जाऊ शकेल, आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यानंतर किमान तापमान खाली येऊ शकेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा