Nashik Crime: संशयित रोडरोमिओच्या तावडीतून सुटण्यासाठी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केल्याने तिचे तोंड दाबून तिला धमकावत संशयित पसार झाला.
भंवरी कलेक्शनसमोरील रस्त्यावर काही दिवसांपूर्वी सकाळी पावणेबारा वाजेच्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. या प्रकाराने घाबरलेली पीडित विद्यार्थिनी मनस्वी (नाव बदललले आहे) हिने आपल्या वडिलांना या प्रकाराची माहिती तब्बल अकरा दिवसांनंतर सांगितली.
त्यानंतर वडिलांनी तिच्यासह नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले आणि संशयित रोडरोमिओ गौतम (पूर्ण नाव माहीत नाही, रा. साकूर, ता. इगतपुरी) याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
राज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी बंद; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय, काय कारण?
सीसीटीव्ही शोभेपुरतेच
चेहेडी पंपिंग स्टेशनच्या ज्या रस्त्यावर ही छेडछाडीची घटना घडली तेथे भगवा चौक आणि नरवीर तानाजी मालुसरे जॉगिंग ट्रॅक प्रवेशद्वार अशा दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या दोन्ही सीसीटीव्हींच्या मधोमध हा प्रकार घडला. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा धाकही रोडरोमिओंना राहिलेला नसल्याची बाबही उघड झाली. जॉगिंग ट्रॅक, भगवा चौक, हनुमान मंदिर चौक या ठिकाणी रोडरोमिओ, टवाळखोरांचा कायमच अड्डा जमलेला असतो.
नेमके काय घडले?
मनस्वी शाळेत दहावीच्या सराव परीक्षेसाठी घरून एकटीच पायी निघाली होती. भगवा चौक येथे भररस्त्यात तिच्या परिचयाचा मामाच्या गावचा संशयित रोडरोमिओ गौतम याने तिला रस्त्यात अडविले. तिचा हात धरून बळजबरीने मिठी मारली. घाबरलेल्या मनस्वीने मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिचे तोंड दाबले. तिने या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्याने संशयिताने पोबारा केला. या प्रकाराबाबत पीडित अल्पवयीन मुलीने भीतीपोटी कुटुंबीयांना अनेक दिवस कल्पनाच दिली नाही. मात्र, पुढे आणखी त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिने वडिलांना दिली. संशयित शाळेच्या रस्त्यावर वारंवार त्रास देत असल्याचेही तिने वडिलांना सांगितले.
Chhagan Bhujbal: विलीनीकरणाची एवढी घाई कशाला? छगन भुजबळ यांचा नेत्यांना सबुरीचा सल्ला
संशयित मोकाटच
या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटला, तरी नाशिकरोड पोलिस दहावीच्या विद्यार्थिनीची भरदिवसा छेड काढणाऱ्या – संशयित गौतम याचा शोध लावू शकलेले नाहीत. पोलिसांच्या कासवगती तपासामुळे ‘पोक्सो’ सारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित मोकाट फिरत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
