Nagpur Child Death : बेपत्ता चिमुकल्याचा नाल्यात मृतदेह सापल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मुलगा आपल्या सहा वर्षीय मामेभावासोबत खेळायला गेलेला. काय घडलं नेमकं?
मोहम्मद कौनेन अन्सारी मोहम्मद इमरान अन्सारी (रा. मेहबुबपुरा, योगी अरविंदनगर, यशोधरानगर) असे मृताचे नाव आहे. कौनेनचे वडील इमरान यांचे हॅन्डलूमचे काम आहे. त्यांची पत्नी गृहिणी असून, त्यांना एक महिन्याची मुलगी आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी कैनान हा सहावर्षीय मामेभावासोबत खेळत होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोघांनी धावण्याची शर्यत लावली. धावताना कौनेन हा यशोधरानगरमधील नाल्यात पडला. मामेभावाला तो दिसला. याचा जबर धक्का त्याला बसला. तो थेट घरी आला व झोपला.
Nagpur Crime : नोकरीचं आमिष देणाऱ्यांपासून सावधान! नागपुरात केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगून 2 कोटींचा गंडा
दरम्यान, कौनेन बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. तो आढळून आला नाही. त्याच्या वडिलांनी यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप बुआ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलाचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीची पाहणी केली. एका सीसीटीव्हीत कौनेन व त्याचा मामेभाऊ जाताना दिसले. समोरील सीसीटीव्हीत मात्र दोघेही दिसले नाहीत. पोलिसांनी कौनेनच्या मामेभावाच्या चौकशीचा निर्णय घेतला. नातेवाइकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला जागे केले. ‘मुझे नींद आ रही हैं’, असे सांगत तो पुन्हा झोपला. शनिवारी सकाळी कौनेनचा मृतदेह नाल्यात आढळला.
Nagpur News: शेतकऱ्यांच्या घामाचं ‘पांढरं सोनं’ जिनिंगमध्ये भस्मसात! भीषण आगीत 12 कोटींची राख, तब्बल 18 हजार क्विंटल कापूस जळून खाक
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. कौनेनच्या मृत्यूने अन्सारी कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची नोंद घेत यशोधरानगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बालकांवर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले.
