• Sat. Mar 7th, 2026

    Pune Metro: पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला वेग! डबल डेकर पुलांवर उभारणार दोन मार्गिका; हडपसर, फुरसुंगीसह कुठे असतील स्थानकं?

    Pune Metro: पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला वेग! डबल डेकर पुलांवर उभारणार दोन मार्गिका; हडपसर, फुरसुंगीसह कुठे असतील स्थानकं?

    Pune Metro Phase 2: पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महामेट्रोने निविदा मागवल्या आहेत. या टप्प्यात मेट्रो लाईन 4-B व 4-C च्या एकूण 14 स्थानकांचं काम पूर्ण करण्यात येणार आहे.

    पुणे: पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी MahaMetroने काम सुरू केलं आहे. या टप्प्यात मेट्रो मार्गिका 4-B व 4-C चा समावेशा आहे. मेट्रो मार्गिका 4-B हडपसर ते लोणी काळभोर जोडणार असून या मार्गिकेवर सध्या 10 स्थानके प्रस्तावित आहेत. शिवाय मेट्रो 4-C ही हडपसर ते सासवड अशी असणार आहे. या मार्गिकेवरील 4 स्थानकांचं काम सध्या सुरू होणार आहे.

    या दोन्ही मार्गिकांसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासाठी अंतिम मुदत 5 मार्च 2026 दिली आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे पूर्व आणि दक्षिणेतील उपनगरांना थेट जोडणी मिळणार आहे. या मेट्रो मार्गिकांसाठी डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर, सासवड या सर्व भागांना थेट या नव्या मार्गिका जोडतील. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ आणि कोंडीमुक्त होणार आहे.

    Maharashtra TimesMumbai Metro Accident: ‘मुलुंडमध्ये मेट्रोच्या खांबावर मोठी भेग’; दुर्घटनेपूर्वीची पोस्ट व्हायरल, MMRDAचं स्पष्टीकरण पाहून नागरिक संतप्त

    मेट्रो लाईन 4 – B

    मेट्रो लाईन 4 -ब 11.102 किमी लांब उन्नत मार्गिका असणार आहे. या मार्गिकेवर एकूण 10 स्थानके असून 2 टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यावर वाहनांसाठी उड्डाणपूल असणार आहे. त्यावरती मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, आकाशवाणी-हडपसर, लक्ष्मी कॉलनी, मंजरी फाटा, द्राक्ष बाग, टोल नाका, वाक वस्ती आणि लोणी काळभोर अशी स्थानकं असतील.

    Maharashtra TimesPune Metro: पुणे मेट्रोसाठी नवे प्रवेशद्वार, एसटी स्टँडवरून थेट स्टेशनवर पोहचणार; स्वारगेट, शिवाजीनगर… कुठे सुविधा सुरु?

    मेट्रो लाईन 4-C

    पुणे मेट्रो 4-C 5.573 किमी लांब असून यावरती ही डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेवर सध्या 4 स्थानके प्रस्तावित आहेत. हडपसर ग्लायडिंग क्लब, फुरसुंगी IT Park< सुलभ उद्यान आणि सासवड रस्ता रेल्वे स्थानक अशी ही स्थानके असतील. यामुळे पुण्याच्या पुर्वेकडील भागांतील वाहतूक सुलब होणार आहे.

    Mulund Metro : मुंबईमध्ये मेट्रोचा पिलरचा वरचा स्लॅब कोसळून भीषण अपघात, कार, रिक्षाचा चेंदामेंदा

    या दोन्ही मार्गिका पुणे मेट्रोच्या Khadakwasla – Kharadi Corridor एक भाग आहेत. या मार्गिकेवरील दोन उड्डाणपूल पुणे-सोलापूर महामार्गाचा भाग असतील. त्यामुळे पुणे-सोलापूर वाहन चालकांचा प्रवासही सुखकर होणार आहे. सध्या पुणे मेट्रो 3 च्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती प्रवाशांसाठी सुरु होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा