Mulund Metro Tragedy : मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिका-४च्या सुरक्षा कठड्याचा स्लॅब कोसळून शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. हा स्लॅब एलबीएस रोडवरून जाणाऱ्या रिक्षा आणि कारवर पडून एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले.
रामधनी यादव हे आपल्या मित्रांसह गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास होते. शनिवारी ते एका रिक्षाने प्रवास करत असताना अचानक मेट्रो मार्गिकेच्या कठड्याचा भाग त्यांच्या अंगावर कोसळला. रामधनी यादव यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि भाऊ असा परिवार आहे. राजकुमार यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव (दोघेही रा. भरथनी) जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकुमार यादव हे मुंबईतील भांडुप परिसरात व्यवसायानिमित्त राहतात, त्यांच्याकडेच हे सर्वजण पाहुणे म्हणून आले असल्याचे त्याचे मित्र शशिकांत यादव यांनी सांगितले.
Mumbai Metro Accident: मुंबईकरांच्या डोक्यावर टांगते संकट; बांधकामाधीन मेट्रोची वर्षभरातील पाचवी दुर्घटना, जबाबदार कोण?
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो प्रशासन, महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी रस्त्याचा एक भाग तातडीने बंद केला. त्यामुळे संपूर्ण दिवसभर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
Mulund Metro Accident : ‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री मुलुंड दुर्घटनेची जबाबदारी घेतील का? हर्षवर्धन सपकाळांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
‘विधानसभेत पुरावे सादर केले होते’
दीड महिन्यापूर्वीच एलबीएस रोडवरील ५० हून अधिक ठिकाणांचे फोटो आणि अहवाल आयुक्त, एमएमआरडीए संजय मुखर्जी यांना देऊन या कंत्राटदाराला निलंबित करण्याची मागणी केली होती. या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाबाबत विधानसभेतही फोटोसह पुरावे सादर केले होते, अशी माहिती स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी दिली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे कोटेचा म्हणाले.
Mulund Metro Accident : मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेनंतर एमएमआरडीए प्रशासनाची मोठी कारवाई, कंत्राटदाराला 5 कोटींचा दंड
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुंबई : या दुर्घटनेबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुर्घटनेतील मृताच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
