काँग्रेस खासदार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सोशल मिडियावर सुरू होत्या. याबाबत बोलताना ‘राजकारणात अशक्य काही नाही; असे विधान अशोक चव्हाणांनी केले होते. यानंतर आता काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. येत्या काही काळात भाजपचे नेते काँग्रेसमध्ये येणार, असे प्रत्युत्तर रवींद्र चव्हाणांनी दिले.