• Wed. Mar 11th, 2026

    ‘टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे’, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य

    ByMH LIVE NEWS

    Feb 14, 2026
    ‘टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे’, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य
    मुंबई 
    मालेगाव उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतान यांचा फोटो भिंतीवर होता. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. या मुद्द्यावरुन नवा वाद निर्माण झाला होता. असं असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल मोठं वक्तव्य करुन या वादाला आणखी नवं वळण आणल्याचं चित्र दिसत आहे. या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे”, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे.

    हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य काय?

    “छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे, त्यांनी स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने विचार नेला आहे, अगदी त्यांच्यांच मांदियाळीमध्ये, त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, अर्थात भूमीपुत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *