• Fri. Mar 13th, 2026
    Anil Deshmukh: परमबीरसिंग यांच्या ‘पापाचा घडा’ भरला; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची टीका, असं का म्हणाले?

    Anil Deshmukh On Parambir Singh: मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालयाने त्यांना ज्या पद्धतीने अपमानास्पदरीत्या बडतर्फ केले आहे, त्यावरून त्यांचे चारित्र्य आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पडले आहे.

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ज्या परमबीरसिंग यांनी मी गृहमंत्री असताना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते, त्याच सिंग यांचे भ्रष्टाचारी कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. त्यांच्या पापाचा घडा आता भरला आहे,’ अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली.

    लीलावती रुग्णालयातील विश्वस्त, डॉक्टरांनी परमबीरसिंग याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सिंग यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडून बढतीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची लाच वसूल करण्याचा उद्योग सुरू केला होता. या घोटाळ्यांमुळे आणि गैरवर्तनामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांना पदावरून काढून टाकले आहे. मी गृहमंत्री असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग या प्रकरणात सरकारची दिशाभूल करत होते, असे देशमुख यांनी सांगितले.

    Maharashtra TimesSunil Tatkare: दादांच्या निधनानंतर शिंदेंनी अशी विधानं करु नयेत! तटकरेंनी शब्द न शब्द वाचला; तीव्र आक्षेप घेतला
    ‘बडतर्फीची कारवाई टाळण्यासाठी परमबीरसिंग यांनी माझ्यावर १०० कोटींचे खोटे आरोप केले. आरोप झाल्याबरोबर मी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टासमोर जेव्हा त्यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले, तेव्हा ते हजर झाले नाहीत.

    भाजपसोबत १ कोटी मोजायला बसले होते का? 20 टक्के कमिशन होतं का?; राऊतांचं देशपांडेंना प्रत्युत्तर

    तब्बल सहा वेळा समन्स काढूनही ते गैरहजर राहिले. शेवटी अटकेच्या भीतीने ते फरारी झाले होते. शेवटी त्यांनी वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर करून ‘माझ्याकडे अनिल देशमुखांविरुद्ध कोणताही पुरावा नाही,’ असे मान्य केले. अशा भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे लीलावती रुग्णालयातील कारनामे पाहता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,’ अशी मागणीही अनिल देशमुख यांनी या वेळी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा