• Sun. Mar 8th, 2026

    Maharashtra Weather: राज्यात उन्हाळ्याची चाहुल, पण सकाळी-रात्री गारवा कायम; ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

    Maharashtra Weather: राज्यात उन्हाळ्याची चाहुल, पण सकाळी-रात्री गारवा कायम; ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

    Weather Update 13th February: फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. सकाळ आणि रात्री थंडी जाणवत असली तरी दिवसा तापमान वाढत आहे. पुढील काही आठवड्यात तापमानात आणखी वाढण्याची शक्यता वरतवली जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: अजूनही तापमानात फारशी वाढ झाली नसली तरी वातावरणाला उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दुपारी काहीशी गर्मी जाणवत आहे. मात्र तरीही सकाळी आणि रात्री गारवा कायम आहे. मुख्य म्हणजे अजूनही आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळत आहे.

    चार-पाच दिवसांत कमाल तापमानात वाढ

    बहुतांश जानेवारी महिन्यापर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश, तर किमान तापमान 14 ते 15 अंशाच्या दरम्यान होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान सुमारे 30 अंशाच्या घरात गेले, तर किमान तापमानही 15 अंशाच्या पुढे सरकले. त्याचवेळी मंगळवारी कमाल तापमान 31.8, तर किमान तापमान 15.5 अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली. साहजिकच मागच्या चार-पाच दिवसांत कमाल तापमानात पावणेदोन अंशांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.Maharashtra TimesMahim-Bandra Flyover: पश्चिम द्रुतगती मार्गावरील कोंडी फुटणार, खाडीवरील पुलामुळे दादर, खार, सांताक्रूझ प्रवाशांना दिलासा; पण तीन वर्षे पूल कागदावरच

    अर्थात, किमान तापमानात वाढ झाली नसल्यानेच सकाळी व रात्री गारवा कायम आहे. त्यामुळे दुपारी काहीशी गर्मी जाणवत असून, उन्हाळी वातावरणाची चाहूल लागल्याचे जाणवत आहे. दुसरीकडे, घराघरांमधील पंखेही आता सुरू झाले आहेत. निदान दुपारी तरी पंखे वापरण्याची वेळ येत आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये तापमानात आणखी काही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी किमान या महिन्यात वातावरण आल्हाददायक राहील, असेही संकेत आहेत.

    सर्वाधिक तापमान कोणत्या जिल्ह्यांमध्ये?

    काल अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान 35.6 अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं. त्यानंतर रत्नागिरीमध्ये सर्वात अधिक कमाल तापमान नोंदवलं गेलं असून, 35.4 अंश सेल्सियस होतं. तसेच, सोलापूरमध्ये 34.4 अंश सेल्सियस, तर ठाणे-बेलापूर परिसरात तापमान 34 अंश सेल्सियस नोंदवलं गेलं.

    Maharashtra TimesKonkan Railway: लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल

    पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापामान 30-32 अंश सेल्सियस पर्यंत होतं. पुणे जिल्ह्यात 31.9 अंश सेल्सियस, साताऱ्यामध्ये 30.7 अंश सेल्सिय,, सांगली 32.6 अंश सेल्सियस तर कोल्हापूर जिल्ह्यात 31 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर किमान तापमान 18-19 अंश सेल्सियस असून कमाल तापमान 29.8 अंश सेल्सियस नोंदवलं गेलं.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा