• Fri. Mar 6th, 2026

    Mumbai News: “मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर ‘वाहतूककोंडी कर’ लावा”, भाजप नगरसेवकाची महापालिकेकडे अजब मागणी; कसा-किती कर लागणार?

    Mumbai News: “मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर ‘वाहतूककोंडी कर’ लावा”, भाजप नगरसेवकाची महापालिकेकडे अजब मागणी; कसा-किती कर लागणार?

    Congestion tax in Mumbai: मुंबईतील वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी भाजप नगरसेवकांनी एक अभिनव प्रस्ताव मांडला आहे. गर्दीच्या व्यावसायिक भागांमध्ये खासगी वाहनांसाठी वाहतूककोंडी कर लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई शहरातील तीव्र वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी आणि शाश्वत शहरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने मुंबईतील गर्दीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये वाहतूककोंडी कर लागू करण्याची अजब मागणी नवनियुक्त भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. हा कर महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात लागू करावा, असेही त्यांनी मागणीत नमूद केले आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिले आहे.

    लंडन, सिंगापूरमध्ये असा कर

    जास्त वाहतूक असलेल्या भागांमध्ये येणाऱ्या खासगी वाहनांवर कर आकारावा. शहरातील वाहतूककोंडी असलेले भाग ओळखून त्या ठिकाणी हा कर लागू करण्याबाबत चर्चा करून गर्दीच्या भागात प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून शुल्क आकारावे, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे. लंडन आणि सिंगापूरसारख्या दाट लोकवस्तीच्या व्यावसायिक भागांमध्ये ही पद्धत यशस्वीपणे राबवली जात आहे.Maharashtra TimesKonkan Railway: लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल

    महापालिकेने या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन या कराच्या वसुलीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तपासणी केंद्रांवर फास्टॅगद्वारे स्वयंचलित शुल्क वसुलीची सुविधा असावी. आगामी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करून पायलट प्रकल्प म्हणून राबवता येईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    अलीकडेच सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात वाहतूककोंडी कमी करण्यासाठी, प्रदूषण घटवण्यासाठी आणि गतिशीलता सुधारण्यासाठी कोंडी शुल्काची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईसारख्या गर्दीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ही योजना पायलट प्रकल्प म्हणून राबवता येईल, असे त्यांनी मागणीपत्रात नमूद केले आहे.

    Maharashtra TimesMahim-Bandra Flyover: पश्चिम द्रुतगती मार्गावरील कोंडी फुटणार, खाडीवरील पुलामुळे दादर, खार, सांताक्रूझ प्रवाशांना दिलासा; पण तीन वर्षे पूल कागदावरच

    कोणत्या वेळेत लावणार कर?

    हा कर अनावश्यक वाहन वापराला आळा घालेल. गर्दीच्या वेळेत (सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८) प्रति प्रवेश ५० ते १०० रुपये इतका कर आकारता येईल. उच्च वाहतूक क्षेत्रे सध्याच्या सीसीटीव्ही आणि एएनपीआर (स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख प्रणाली) कॅमेऱ्यांच्या मदतीने निश्चित करता येतील. या उपक्रमातून दरवर्षी अंदाजे दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा