Chhatrapati Sambhaji Nagar News: जिल्ह्यातील एका शाळेत मुलांना अपमानास्पद शिक्षा दिली आहे. त्यामुळे पालक वर्गात संताप आहे. मुख्याध्यापकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, चिकलठाणा येथील शारदा सुमन प्राथमिक व माध्यमिक शाळेत गुरुवारी म्हणजेच १२ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. शाळेत काही विद्यार्थी केस वाढवून आले होते. त्यांना शिस्त लावण्याच्या बहाण्याने मुख्याध्यापकांनी चक्क खुल्या मैदानात सर्वांसमोर उभे केले आणि त्यांच्या केसांना रबर लावून केस बांधण्याची शिक्षा दिली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Satara Crime: खळबळजनक! बनावट नियुक्ती पत्र, खोट्या मुलाखतीही घेतल्या; तरुणांची तब्बल 1.80 कोटींची फसवणूक; नगरसेविका, PWD विभागातील अधिकाऱ्यांचा कारनामा
उद्या लिपस्टिक, बांगड्या घालायला लावू
आज केस बांधले आहेत. उद्यापासून लिपस्टिक लावून आणि बांगड्या घालून यायला लावू असे अपमानस्पद वक्तव्य मुख्याध्यापकांनी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि अपमानाची भावना निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना चारचौघात अपमानास्पद वागणूक देण्यात आल्यानं पालक वर्गात मोठा संताप आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Pune News: पुण्यात PMPML च्या चालत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग, 50 कामगार थोडक्यात बचावले, क्षणात बसचा सांगाडा…, आगीचं नेमकं कारण काय?
शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये, चौकशीचे आदेश
या घटनेची गांभीर्याने दखल घेत महानगरपालिका शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे यांनी तीन सदस्यीय समिती नेमून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीने प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी अशा प्रकाराची शिक्षा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मनपा शिक्षण विभागाने याप्रकरणी शाळेला नोटीस बजावली असून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात शाळेच्या व्यवस्थापनाकडून गंभीर चूक झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, दोषींवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
