• Wed. Aug 19th, 2026

Ahilyanagar | मुलांच्या अभ्यासासाठी भोंगा, दीड तास नो गॅजेट्स ! राहुरी नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम

Ahilyanagar | मुलांच्या अभ्यासासाठी भोंगा, दीड तास नो गॅजेट्स ! राहुरी नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंगा वाजला की नागरिकांना घरातील टीव्ही, मोबाईल अशी मनोरंजनाची साधने बंद करून मुलांना अभ्यासासाठी बसवायचे आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी सात वाजता भोंगा वाजणार आहे. रात्री साडेआठ वाजता दुसरा भोंगा वाजल्यावर घरात पूर्ववत वातावरण करण्यास हरकत नाही. मुलांनी दररोज किमान दीड तास अभ्यास करावा, यासाठी भोंगा वाजणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषदेनं हा ठराव मंजूर केलाय. राहुरी नगरपालिकेवर सत्तेत येताच पहिल्या सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed