म्हाळुंगे येथील नांदे-म्हाळुंगे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात रिषभ संदीप पाटोळे (वय १०, रा. राजयोग सोसायटी, ठाकरनगर, माण) याचा मृत्यू झाला. वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून तो शिकवणीला जात होता. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली आणि रिषभ थेट टेम्पोखाली आला.
Pune Crime : सिंहगडावर विकृतांचा तरुणींना चुकीचा स्पर्श, पुण्यात पर्यटकांचा दावा, तुफान गर्दीच्या बहाण्याने असभ्य वर्तन‘तरी प्रश्न सुटत नाही’
वाद वाढल्यानंतर आमदारांनी रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादनाचा अडथळा असल्याचे सांगितले. सुस, नांदे, माण आणि म्हाळुंगे परिसरातील रस्त्यांचे भूसंपादन टीपी स्कीम, तसेच सातबारा नोंदींच्या प्रश्नामुळे रखडल्याचा दावा त्यांनी केला. ‘या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर आहे. मी स्वतः तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विधिमंडळात हा प्रश्न मांडत आहे; मात्र सरकारच्या पातळीवर प्रश्न सुटत नाही. मी तरी काय करणार?’ अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
संतप्त नागरिकांचा घेराव
अपघातानंतर मंगळवारी संतप्त नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांना घेराव घालून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जाब विचारला. त्या वेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ‘फ्लॅट घेताना इथले रस्ते कसे आहेत, हे पाहिले नव्हते का?’ असा सवाल आमदारांनी केल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, पत्रकारांनी रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाची जबाबदारी आणि या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ‘रस्ते आहेत म्हटल्यावर अपघात होणारच; लहान गाडी आडवी आली की मोठ्या गाडीवरच गुन्हा दाखल होतो,’ अशी भूमिका मांडेकर यांनी मांडली. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशीही त्यांनी आक्रमक पद्धतीने संवाद साधल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
Ganesh Bidkar: पुणे पालिकेत महायुतीत ठिणगी; ‘युती फक्त राज्यात’ म्हणत गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशाराचिमुकल्याचा अपघाती मृत्यू
पिंपरी : शिकवणीला जाण्यासाठी वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून निघालेल्या अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी नांदे-म्हाळुंगे रस्त्यावर घडली. रिषभ पाटोळे (वय १०, रा. माण, हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील संदीप पाटोळे (वय ३८) यांनी बावधन पोलिसांत फिर्याद दिली. टेम्पो चालकाविरुद्ध बावधन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोळे यांचे वाहन खड्ड्यात आदळून घसरले. या वेळी रिषभ शेजारून जाणाऱ्या ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
